RBI Credit-Debit Card Rules | क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डसंदर्भात RBI ची नवीन नियमावली जारी; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – RBI Credit-Debit Card Rules | भारताची सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of India) बँक आणि कंपन्यांसाठी क्रेडिट कार्ड (Credit Card), डेबिट कार्डाबाबत (Debit Card) नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. आरबीआयच्या नियमानुसार आता सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँका (Nationalized banks) आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना (NBFCs) पाळावे लागणार आहेत. तसेच, राज्य सहकारी बँका (Maharashtra State Co-operative Banks), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (District Central Co-operative Banks) आणि पेमेंट बँकांना (Payment Banks) ही नवीन नियमने (RBI Credit-Debit Card Rules) लागू होणार नाहीत.

 

आरबीआयने (RBI) आता जारी केलेले हे नियम 1 जुलै 2022 पासून लागू केले जाणार आहे.
दरम्यान, मागील काही वर्षात क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जारी केल्यानंतर कंपन्यांनी मनमानी केल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत.
तसेच हे गैरप्रकार रोखण्यासाठी बँकेनं नियम जारी केले आहेत. कार्ड बंद होण्यास अनेकदा विलंब होतो, त्यामुळे ग्राहकांना काही वेळा मोठा दंड भरावा देखील लागतो.
यानंतर, आता आरबीआय ग्राहकांच्या विनंतीवरून RBI ने क्रेडिट आणि डेबिट कार्ड सात दिवसांच्या आत बंद करणे अनिवार्य केलं आहे.
त्याचबरोबर न केल्यास प्रतिदिन पाचशे रुपयांचा दंड बँकांना ग्राहकांना द्यावा लागणार आहे.
यामुळे ग्राहकांना एक दिलासा मिळाला आहे. (RBI Credit-Debit Card Rules)

 

कार्ड बंद झाल्याच्या सूचना ग्राहकांना द्याव्या लागणार..

जर एखाद्या कार्डधारकाने सर्व बिले भरली, तर ग्राहकांच्या विनंतीनुसार, कंपनी अथवा बँकेला 7 दिवसांच्या आत कार्ड बंद करावे लागेल.
असं न केल्यास, 7 दिवसांनंतर, बँकेला ग्राहकांना दररोज 500 रुपये दंड द्यावा लागणार आहे.
तसेच. बँकेला क्रेडिट आणि डेबिट कार्ड बंद झाल्याची माहिती ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीवर लवकरात लवकर पाठवावी लागणार आहे.

 

दरम्यान, जर एखाद्या व्यक्तीने 1 वर्ष क्रेडिट कार्डचा वारंवार वापर केला नाही तर अशा परिस्थितीत बँक त्यांचे कार्ड बंद करू शकते.
पण, असे करण्यापूर्वी बँक ग्राहकाला माहिती देईल.
मेसेज पाठवल्यानंतर 30 दिवसांच्या आत ग्राहक प्रतिसाद देत नसेल अथवा कार्ड वापरत नसेल,
तर अशा स्थितीत बँक ग्राहकांचे क्रेडिट कार्ड बंद करू शकते. असे निर्देशही आरबीआयने दिले आहेत.

 

Web Title :- RBI Credit-Debit Card Rules | reserve bank (RBI) master circular for credit and debit card rural banks and urban cooperative banks can issue credit card

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा