RBI कडून कर्जदारांना मोठा दिलासा ! EMI न भरण्याची मुभा 3 महिन्यांनी वाढवली

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरातील आर्थिक घडामोडींवर कोरोनाच्या संकटाचा परिणाम झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात 40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार परिषदेत दिली. रेपो दर कपातीमुळे सामान्यांना दिलास मिळणार असून कर्जावरील व्याज कमी होणार आहे. दरम्यान, कर्जदारांना त्यांच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठीची मुभा 3 महिन्यांनी वाढवण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज सकाळी रेपो रेट संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. रेपो रेटमध्ये 40 बेसिक पॉईंटची कपात करण्यात आली आहे. रेपो रेट आता 4.4 टक्क्यावरुन 4 टक्के करण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेटमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के कायम राहणार आहे. महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरु आहे असे शक्तीकांत दास यांनी सांगितले.

शभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचे कर्ज घेतात त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.