खुशखबर ! RBI कडून रेपो दरात कपात ; गृहकर्ज आणखी स्वस्त होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुका तोंडावर असताना रिझर्व बँकेने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रिजर्व बँकेने रेपो रेट मध्ये ०. २५ टक्के इतकी कपात केली आहे. पूर्वी ६.२५ टक्के असणारा रेपो रेट कमी करून ६ टक्के करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यामुळे कर्जधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. या पतधोरणात रेपो रेटमध्ये कपात अपेक्षित होती. त्यानुसार रेपो दरात आणखी पाव टक्का कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

याआधी फेब्रुवारी २०१८ मध्ये RBI च्या पतधोरण समितीच्या द्विमासिक आढावा बैठकीत रेपो दाराला कात्री लावण्यात आली होती. त्यावेळी रेपो रेट ६.५० वरून ६. २५ इतका करण्यात आला होता. आता २०१९ मध्ये पुन्हा एकदा रेपो दरात कपात करण्यात आली असून रेपो दर ६ टक्के करण्यात आला आहे. RBI च्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच गुंतवणूक क्षेत्राला चालना मिळणार आहे.

काय होईल परिणाम ?

— व्याजाचे दर खालावत जाण्याचे सर्वसामान्यांचे जीवनावर दोन्ही अंगांनी परिणाम संभवतात.

–बँकांमध्ये ठेवीदार असणाऱ्यांना आजच्या तुलनेत त्यांच्या ठेवींवर व्याजाचा लाभ कमी होईल, त्याच वेळी कर्जदारांना अथवा कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना व्याजदरात सवलत मिळविता येईल.

— अलीकडचा बँकांचा अनुभव पाहता, रिझव्‍‌र्ह बँकेच्या कपातीनंतर ठेवींवर देय व्याजदरात बँकांच्या तत्परतेने कपात करतात, मात्र कर्जावरील व्याजदरात कपात करताना बँकांकडून दिरंगाई होत असते. तथापि गृह कर्जासारख्या मोठय़ा रकमेचे कर्ज घेणाऱ्यांना व्याजदरातील किंचित कपातही दिलासादायी निश्चितच ठरते.

— मासिक हप्त्यात आनुषंगिक घट होण्याने कुटुंबासाठी अन्य आवश्यक खर्चासाठी यातून त्यांना निधी उपलब्ध होतो.