RBI Decision Dry ATMs | जर ATM मध्ये तुम्हाला मिळाली नाही कॅश तर ‘या’ नंबरवर करा फोन, RBI संबंधित बँकेकडून घेईल 10 हजारांचा दंड; जाणून घ्या

नवी दिल्ली : RBI Decision Dry ATMs | ‘ड्राय एटीएम’ विरूद्ध रिझर्व्ह बँकेने मोठी घोषणा केली आहे. ड्राय एटीएमचा अर्थ हा आहे की, ज्यातील पैसे संपले आहेत. रिझर्व्ह बँकेने ड्राय एटीएमबाबत मोठा निर्णय घेतला आहे (RBI has taken a big decision regarding dry ATMs). आरबीआयने म्हटले आहे की, ज्या बँकेचे असे एटीएम असेल, त्या बँकेला 10,000 रुपयांचा दंड (Rs 10,000 fine) केला जाईल. या स्थितीत ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर (Twitter) किंवा फेसबुक (Facebook) पेजसह फोन नंबर 011 23711333 वर फोन करू शकतात.

डब्ल्यूएलएओ कंपन्यांना सुद्धा चाप

बँकांशिवाय व्हाईट लेबल एटीएम ऑपरेशन (WLAO) साठी सुद्धा रिझर्व्ह बँकेने नियम जारी केला आहे. डब्ल्यूएलएओ कंपन्यांद्वारे वेगवेगळ्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकतात.

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँकांना याकडे लक्ष ठेवावे लागेल की, एटीएममधील पैसे संपू नये. जी बँक या नियमाचे पालन करणार नाही तिला दंड केला जाईल. हा दंड 10,000 असेल. हा नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होत आहे.

पैसे मिळाले नाहीत तरच तक्रार करता येईल

दंडाची तरतूद तेव्हा लागू होईल जेव्हा एखादा कस्टमर एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाईल आणि त्यास रक्कम मिळणार नाही. अशा स्थितीत कस्टमर रिझर्व्ह बँकेला थेट तक्रार करू शकतो.

महिन्याला 10 तासांची सूट

नियमात ठरवले आहे की, एक महिन्यात एखाद्या एटीएममध्ये 10 तासापेक्षा जास्त वेळपर्यंत कॅशची कमतरता असू नये. यापेक्षा वेळ वाढली तर बँकेला दहा हजार दंड होईल. WLAO च्या केसमध्ये सुद्धा बँकेला दंड लागेल. बँकेला ठरवावे लागेल की ते डब्ल्यूएलएओकडून किती आणि केव्हा दंड वसूल करणार आहेत.

Ajit Pawar | राज ठाकरेंच्या बोलण्याला महत्व देण्याची गरज नाही – अजित पवार

काय आहे नवीन नियम (What is New Dry ATM Rules)

– रिझर्व्ह बँकेच्या रिजनल ऑफिसच्या इश्यू डिपार्टमेंटकडून बँकेला दंड केला जाईल.

– यासाठी कम्पीटंट अथॉरिटी म्हणून रिजनल ऑफिसच्या इश्यू डिपार्टमेंटच्या ऑफिसर इनचार्जला अधिकृत केले आहे.

– याच अधिकार्‍याच्या कार्यक्षेत्रात हे एटीएम येतील ज्यांच्यावर कॅशबाबत देखरेख केली जाईल.

– जर एखाद्या बँक किंवा WLAO ला दंडाविरूद्ध अपील करायचे असेल तर रिजनल ऑफिसचे रिजनल डायरेक्टर किंवा ऑफिसर इन्चार्जशी संपर्क करावा लागेल. यासाठी एक महिन्याचा कालावधी आहे.

– दंड लागल्याच्या तारखेपासून 30 दिवस मोजण्यात येतील.

– रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय ग्राहक सेवा आणि समाधानासाठी आहे, यासाठी दंडाविरूद्ध केलेल्या अपीलात योग्य आणि चुकीच्या कारणाचा शोध घेतला जाईल.

– कारण योग्य आढळल्यास अपीलावर कारवाई सुरू केली जाईल.

हे देखील वाचा

Zycov D Vaccine | 12 वर्षावरील सर्व वयोगटासाठी नवीन कोरोना व्हॅक्सीन Zycov D, कसे होईल व्हॅक्सीनेशन; जाणून घ्या

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरून 19 वर्षीय पत्नीचा खून; पुण्याच्या वडगाव धायरी परिसरातील घटना

Pune Police | सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : RBI Decision Dry ATMs | atm out of cash or dry atm bank will be fined of 10000 for not having cash in atm

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update