चेक ट्रंकेशन (CTS) सिस्टमवर RBI चे निर्देश, तुमच्यावर होणार थेट परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 30 सप्टेंबरपासून सर्व बँकांमध्ये चेक ट्रन्केशन सिस्टम (CTS) लागू होणार आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांना सूचना दिल्या आहेत. क्लिअरिंग चेकच्या या नव्या यंत्रणेअंतर्गत 24 तासांत चेक क्लियर केला जाईल.

दरम्यान, ही चेक ट्रन्केशन सिस्टम 2010 मध्येच सुरू करण्यात आली होती, परंतु आता ती मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. आतापर्यंत ही व्यवस्था केवळ विविध बँकांच्या 1.50 लाख शाखांमध्ये लागू केली गेली आहे. जुन्या प्रणालीनुसार चेक क्लियर करण्यास अधिक वेळ लागतो आणि त्याच वेळी चेक कलेक्शन करण्याची किंमतही जास्त असते.

या व्यवस्थेनुसार चेक केवळ प्रत्यक्ष तपासणीच्या प्रतिमेद्वारेच चेक क्लीयरिंग केला जातो. सीटीएस अंतर्गत देय आणि ठेवींसाठी नॉन-पेपर नॉन-फिजिकल पडताळणी केली जाते. म्हणजेच चेक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी (एका बँकेतून दुसर्‍या बँकेत) फिरवावा लागत नाही, ज्यामुळे वेळ वाचतो. चेकशी संबंधित माहिती इलेक्ट्रॉनिक मार्गाने सबमिट केली जातो, जो चेेक देणार्‍या व्यक्तीद्वारे केला जातो. उदाहरणार्थ, धनादेश जारी करणार्‍याला चेक नंबर, चेकची तारीख, खाते क्रमांक, चेेेेकची रक्कम इत्यादींची माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सबमिट करावी लागते. खास गोष्ट अशी आहे की यामुळे फसवणूकीची शक्यता देखील कमी होते.