RBI चा आदेश ! जानेवारीपासून NEFT आणि RTGS व्यवहारांवर कुठलाही चार्ज घेऊ नका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर सिस्टम म्हणजेच एनईएफटी सुविधा चोवीस तास आणि सातही दिवस सुरू केल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्देश दिले आहेत की, एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे होणाऱ्या ऑनलाईन आर्थिक व्यवहारांवर कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. अनेक बँकांनी यापूर्वीच या सेवा निशुल्क केल्या आहेत. आता उर्वरित बँकांना या सेवा पुढील महिन्यापर्यंत निशुल्क कराव्या लागणार आहेत.

आरबीआयने या आठवड्यात जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की, डिजिटल रिटेल पेमेन्टवर भर देण्यासाठी आरबीआयने असा निर्णय घेतला आहे की, बँक आपल्या खातेदारांकडून होत असलेल्या एनईएफटी ऑनलाइन व्यवहारांवर कोणतेही शुल्का घेणार नाही. हा नविन नियम १ जानेवारी २०२० पासून लागू होणार आहे. एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहारांवर आरबीआय शुल्क आकारात होती, ते आता बंद केले आहे. आरबीआयने बँकांना असेही सांगितले होते की, त्यांनी याचा फायदा आपल्या ग्राहकांना करून द्यावा. ज्यानंतर एसबीआय आणि आयसीआयसीआयसारख्या बँकांनी एनईएफटी सेवा पूर्णपणे निशुल्क केली होती.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली एसबीआय ही योनो, इंटरनेट बँकिंग तथा मोबाईल बँकिंगच्या ग्राहाकांडून आयएमपीसी, आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारात नाही. तसेच एचडीएफसी बँकसुद्धा एनईएफटीवर शुल्क आकारत नाही. आरबीआयच्या पहिल्या आदेशानुसार बँक १०००० रूपयांपर्यंत पैसे पाठविण्यासाठी २.५० रूपये, १०००१ रूपयांपासून १ लाखांपर्यंत पैसे पाठविण्यासाठी ५ रूपये आणि १ लाख रूपये आणि त्यापेक्षा जास्त पैसे पाठविण्यासाठी १५ रूपये आणि २ लाख रूपयांपेक्षा जास्त पैसे पाठविण्यासाठी २५ रूपयांपेक्षा जास्त शुल्क घेऊ शकत नाहीत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/