RBI चा मोठा निर्णय ! बँकांची तयारी नसल्याने ‘ऑटो डेबिट’ प्रणालीला पुन्हा मुदतवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक मोठा निर्णय घेतला आहे. तर १ एप्रिल या महिन्यापासून OTT प्लॅटफॉर्मद्वारे प्रति महिना फी आकारण्यासाठी राबविण्यात येणारी ‘ऑटो डेबिट’ (Auto debit) प्रणालीला ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ऑटो डेबिट’ सुविधा नेहमीप्रमाणे सुरुच असणार आहे. तसेच या नव्या प्रणालीची अंमलबजाणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँका आणि वित्त संस्थांना कारवाईचा इशारा RBIने दिला आहे.

RBI ने घेतलेल्या या निर्णयामुळे कोट्यावधी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा फायदा केवळ ‘OTT’ प्लॅटफॉर्मच्या ग्राहकांनाच न होता मोबाइल बिल किंवा इतर बिलांसाठीही होणार आहे. प्रति महिना परस्पर ग्राहकांच्या बँक खात्यामधून रक्कम जाण्याच्या पद्धतीला चाप बसणार आहे. ग्राहकांची ऑनलाईन होणारी फसवणूक रोखणे शक्य होणार आहे. RBI ने यापूर्वी २०२० च्या जानेवारी महिन्यात या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीला मुदतवाढ दिली होती. तसेच नव्या नियमांनुसार बँका ऑटो डेबिट पेमेंटच्या निर्धारित तारखेच्या ५ दिवस अगोदर ग्राहकांना मेसेज पाठवेल. संबंधित प्लॅटफॉर्मसाठीची रक्कम देण्यास ग्राहकाने मंजुरी दिल्यानंतरच ती रक्कम त्याच्या खात्यातून वजा होईल. इतकेच नाही तर, बिलाची रक्कम ५००० रुपयांपेक्षा अधिक असेल, तर बँकेकडून ग्राहकाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP’ सेंड करण्यात येईल.

तर ग्राहकहिताचा विचार करून RBI ने याबाबत नियमांमध्ये बदल केले आहेत. मात्र उद्याच १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी झाल्यास ग्राहकांना फटका बसेल, असे मत बँकांनी RBI कडे व्यक्त केले होते. त्यामुळे बँकांना आणि सेवा पुरवठादारांना या नव्या प्रणालीमध्ये परावर्तीत होण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज रिझर्व्ह बँकेने घेतला. या अंतिम मुदतीनंतर नव्या नियमावलीचा स्वीकार केला नाहीत तर कठोर कारवाई केली जाईल, असे निर्देश यावेळी RBI ने दिले आहेत.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने मधील काळात एक्का निवेदनात Debit किंवा Credit कार्डद्वारे मोबाइल वॉलेट किंवा ‘OTT’ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रति महिना कापून घेण्यात येणाऱ्या रकमेच्या व्यवहारांवर ‘Additional Factor of Authentication चा बडगा उगारण्यात येणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यासाठी नवी नियमावली तयार करण्याचे संकेतही देण्यात आले होते. ही नवीन नियमावली OTT Auto debit system of subscriptions and digital news subscriptions वर लागू होणार आहे. RBI च्या नव्या नियमाचा परिणाम देशातील कोट्यवधी ग्राहकांवर होणार आहे. तर व्यवहारांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे.