नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI Fraud Alert | कोरोना महामारीनंतर (Coronavirus) देशात डिजिटल व्यवहार (Digital Transactions) झपाट्याने वाढले आहेत. ज्यामध्ये बहुतांश ऑनलाइन प्रॉडक्टच्या खरेदीसाठी ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करण्यात आले आहे. त्याच वेळी, सोशल डिस्टन्सिंगमुळे (Social Distance) अनेकांनी ऑनलाइन ट्रांजक्शनने (Online Transactions) पैसे ट्रान्सफर (Money Transfer) केले आहेत. (RBI Fraud Alert)
पण एवढे करूनही डिजिटल फ्रॉडचे (Digital Fraud) आकडे बघितले तर कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Cheating) घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत अलर्ट (RBI Fraud Alert) जारी केला आहे. ज्यामध्ये तुम्ही ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) कशी टाळू शकता हे सांगितले आहे.
.@RBI कहता है…
अलर्ट रहें!
अपने बैंकिंग विवरण जैसे पिन, सीवीवी, ओटीपी को किसी के साथ साझा न करें
#beaware #besecure
#rbikehtahai #statsafe
#digitalsafety
https://t.co/mKPAIp5rA3 pic.twitter.com/W6whDGmjJs— RBI Says (@RBIsays) February 2, 2022
RBI ने ट्विटरवर शेयर केला अलर्ट –
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर (RBI Twitter Post) एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात सांगण्यात आले आहे की बँकिंग ट्रांजक्शनसाठी (Banking Transactions) सुरक्षित वेबसाइट आणि अॅप्सचा वापर करा. तसेच पब्लिक नेटवर्क (Public Network) वापरणे टाळा. तसेच, पासवर्ड (Password) आणि पिन (PIN) कुठेही लिहून सुरक्षित ठेवू नका.
फसवणूक करणारे अशी करतात दिशाभूल –
सायबर फ्रॉडच्या (Cyber Fraud) प्रकरणांमध्ये, अनेकदा असे दिसून आले आहे की फसवणूक करणारे एखाद्या अधिकृत क्रमांकामध्ये काही अंकांचा बदल करून आपल्यासाठी नंबर घेतात आणि एखाद्या कंपनीची निवड करून त्यावर नोंदणी करतात.
यानंतर, सामान्य लोकांना कॉल करून, मेसेज पाठवून, CVV, OTP आणि PIN सारखी आवश्यक माहिती लोकांशी बोलून काढतात. यानंतर तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे करतात.
फ्रॉड टाळण्याचे मार्ग
* आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही बँकिंग व्यवहारासाठी पब्लिक नेटवर्कचा वापर टाळा.
कारण यामुळे फसवणूक होण्याचा धोका वाढतो आणि तुमची वैयक्तिक माहिती लीक होते.
* जेव्हा तुम्हाला बँक किंवा वित्तीय कंपनीकडून कॉल येतो तेव्हा तुमच्या बँक खात्याचा ओटीपी, पिन शेअर करू नका.
कारण बँक किंवा वित्तीय कंपनी तुमच्याकडून कधीही वैयक्तिक माहिती मागत नाही.
Web Title :- RBI Fraud Alert | rbi fraud alert careful while doing digital transactions rbi warns fraudsters are watching your earnings
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update