‘कोरोना’वर RBI नं उचलली ‘ही’ 2 मोठी पावलं, पुढच्या बैठकीत व्याजदरात कपात शक्य

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आरबीआय गव्हर्नरने सांगितले की, भारत सुद्धा कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त संसर्ग झालेले रूग्ण सापडले आहेत. कोरोना व्हायरसच्या परिणामावर ते म्हणाले, आरबीआयने दोन मोठी पावले उचलली आहेत. यावेळी त्यांनी येस बँकेच्या संकटावरही भाष्य केले. येस बँकेच्या खातेदारांना त्यांनी आश्वस्त केले की, त्यांचे पैसे सुरक्षित आहेत.

कोरोना व्हायरसवर शक्तिकांत दास म्हणाले की, टूरिझम, हॉस्पिटॅलिटी आणि एयर लाइन्ससह अनेक सेक्टर्सवर याचा परिणाम होत आहे. आर्थिक बाजाराची स्थिती चांगली ठेवण्यासाठी आरबीआयने योग्य ती पावले उचलली आहेत.

1. आरबीआयने जी दोन पावले उचलली आहेत, त्यापैकी पहिले म्हणजे, पुढील 6 महिन्यापर्यंत अमेरिकन डॉलरचा सेल बाय स्वॅप करण्यात येईल.

2. आरबीआय सध्याच्या व्याजदरावर 1 लाख करोड रुपयांपर्यंत अनेक हप्त्यांमध्ये एलटीआरओ (लॉन्ग टर्म रेपो ऑपरेशन) करेल. यानंतर याचा रिव्ह्यूदेखील केला जाईल.

एमपीसीच्या पुढील बैठकीत कमी होऊ शकतात व्याजदार

व्याजदराच्या कपातीवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कायदेशिर पद्धतीने हा निर्णय केवळ आर्थिक आढावा धोरण बैठकीतच घेतला जाऊ शकतो. पुढील बैठक झाली तर त्यामध्ये विचार होऊ शकतो.

येस बँक पूर्णपणे सुरक्षित
यापूर्वी जर एखादी बँक संकटात आली तर तिचे विलिनिकरण करण्यात येत होते. यावेळेला आम्ही असे पाऊ उचलले नाही. आम्हाला वाटते की येस बॅकेची स्वताची ओळख कायम राहावी. डिपॉझिटर्सचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. गव्हर्नर म्हणाले, भारतातील बँकिंग सेक्टर पूर्णपणे सुरक्षित आहे. पब्लिक सेक्टरपासून प्रायव्हेट सेक्टरपर्यंत सर्व बँका सुरक्षित आहेत. याबाबत कोणत्याही गुंतवणुकदाराने काळजी करण्याचे कारण नाही.

येस बँकेकडे आवश्यक लिक्विडिटी आहे. जर गरज पडली तर रिझर्व्ह बँक त्यांना उपलब्ध करून देईल. लिक्विडटीबाबत रिझर्व्ह बँक पूर्णपणे आधार देईल. आता येस बँकेचा रिव्हायवल प्लान यशस्वी होईल.

जगातील प्रमुख बँकांनी व्याजदरात केली कपात

अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने सुद्धा लागोपाठ दुसर्‍यांदा रविवारी व्याजदरात कपातीची घोषण केली आहे. फेड रिझर्व्ह बँकेने ही कपात मंदीच्या भितीने केली आहे. अमेरिकेसह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, यूरोपियन यूनियनने सुद्धा सर्व प्रकारच्या व्याजदरात कपातीची घोषणा केली आहे.

जपानने उचलली आवश्यक पावले

बँक ऑफ जपानने सुद्धा एक्सचेंज ट्रेडेड फंडची दुप्पट खरेदी केली आहे. सोबतच, या बँकेने कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि कमर्शियल पेपरची खरेदी अगोदरच्या तुलनेत वाढवली आहे. यानंतर अंदाज आहे की, बँक ऑफ जपानसुद्धा व्याजदरात कपात करू शकते.

का जरूरी आहे व्याजदरातील कपात?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आरबीआय व्याजदरात 100 आधार अंक म्हणजे 1 टक्केपर्यंत कपातीचा निर्णय घेऊ शकते. पण, हे एकदाच करण्यात येणार नाही. अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती आणि कोरोना व्हायरसमुळे आर्थिक उलाढाल मंदावल्याने बाजारात तरलता राहण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे.
सोबतच, होलसेल फंडिंगवर अवलंबून राहणार्‍या नॉन-बँकिंग आर्थिक संस्था आणि बँकांना योग्य फंडिंग मिळावे. जर, आरबीआयने व्याजदरात कपातीचा निर्णय घेतला तर अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यास मदत होईल.

सध्या किती आहे रेपो रेट?
आरबीआयची पुढील एमपीसीची बैठक 31 मार्चपासून 3 एप्रिलदरम्यान होणार आहे. आरबीआयने मागच्यावेळी 4 ऑक्टोबरला रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात करून नऊ वर्षांतील निचांक पातळी 5.15 टक्क्यांवर आली होती. तर रेपो रेटमध्ये फेब्रुवारी 2019 च्यानंतर एकुण 135 बेसिस पॉईंटची कपात केली आहे.