खुशखबर ! RBI ने बँक ग्राहकांसाठी वाढवला KYC चा कालावधी, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी बँकांमध्ये केवायसी अपडेटचा कालावधी तीन महिन्यांनी वाढवून 31 मार्च, 2022 केला. केंद्रीय बँकेने वाढता कोरोना संसर्ग पाहता (KYC) अपडेट करण्याची तारीख वाढवून 31 मार्च 2022 केली आहे.

 

ग्राहक KYC अपडेट करण्यासाठी डॉक्युमेंट ई-मेल किंवा पोस्टाने पाठवू शकतात. कागदपत्र घेऊन त्यांना बँकेत जाण्याची गरज नाही. याशिवाय ग्राहक व्हिडिओ केवायसी सुद्धा करू शकतात.

 

मे मध्ये देशात COVID-19 ची दुसरी लाट आणि विविध राज्यांत लागू प्रतिबंधामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डिसेंबर 2021 पर्यंत बँका आणि इतर वित्तीय संस्थांना ग्राहकांविरूद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते.

 

जर केवायसी केले नाही तर काय होणार?
बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना नवीन केवायसी डॉक्युमेंटसह बँकेत जाऊन किंवा ऑनलाइन अपडेट करून ते पूर्ण करावे लागेल. बँकेचे म्हणणे आहे की, जर केवायसी पूर्ण केले नाही तर खात्यात भविष्यात करण्यात येणार्‍या व्यवहारांवर प्रतिबंध लावला जाऊ शकतो.

RBI चे KYC नियमांबाबत नियम
कोणत्याही बँकेत अकाऊंट उघडण्यासाठी केवायसीची आवश्यकता असते. रिझर्व्ह बँकेकडून हे अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसी एक प्रकारची ग्राहकाची ओळख पटवण्याची प्रक्रिया असते, ज्यासाठी काही कागदपत्रे जमा करावी लागतात. जी कागदपत्रे जमा केली जातात त्यांना केवायसी कागदपत्रे म्हटले जाते.

 

RBI ने कोरोना संसर्ग पाहता नियमात बदलांची घोषणा केली होती.
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले होते की, सध्याचे कोरोना संकट पाहता केवायसी नियमात काही बदल करण्यात आले आहेत.
बँका यावर्षी 31 डिसेंबरपर्यंत केवायसी अपडेट नसल्यास खात्यातील व्यवहारांवर प्रतिबंध लावू शकणार नाहीत.

 

Web Title :- RBI | good news rbi extends deadline for kyc update by three months check details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO e-Nomination | EPFO ने वाढवली ई-नॉमिनेशन सबमिट करण्याची शेवटची तारीख, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Kirit Somaiya | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सोमय्यांचा खळबळजनक दावा; म्हणाले – ‘पवार आणि ठाकरेंनी राहुल गांधींचं पपलू केलं’

New Year Celebration | नवीन वर्षाच्या उत्सवात भान हरवू नका ! ‘या’ चुकांमुळे तुमच्या घरात येऊ शकतो कोरोना व्हायरस

Ajit Pawar | पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवार पुन्हा संतापले; म्हणाले – ‘मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार’