‘RBI’ गव्हर्नर शक्तिकांत ‘दास’ यांना महिन्याला मिळतो ‘इतके’ लाख ‘पगार’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयच्या गव्हर्नरचा पगार तुम्हाला माहित आहे का ? त्यांना महिन्याला जवळपास 2.87 लाख रुपये पगार मिळतो. सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना महागाई भत्त्याच्या बरोबर इतर भत्ते देखील मिळतात. माइकल पात्रा यांना आरबीआयचे नवे डिप्टी गव्हर्नर म्हणून नियुक्त केले गेले आहे. विरल आचार्य यांची राजीनामा दिल्यानंतर माइकल पात्रा यांची या पदावर 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

आरबीआयचे गव्हर्नर आणि डिप्टी गव्हर्नर यांच्या पगारात फार काही फरक नसतो. डिप्टी गव्हर्नरच्या तुलनेत आरबीआयच्या गव्हर्नरला 31 हजार जास्त पगार असतो. गव्हर्नर शिवाय चार डिप्टी गव्हर्नर असतात. माइकल पात्रा यांच्या नियुक्तीनंतर आता एन एस विश्वनाथन, बी पी कागूगो आणि एम के जैन असे चार डिप्टी गव्हर्नर आहेत. विश्वनाथन यांच्या कार्यकाळात आणखी एक वर्षासाठी वाढ करण्यात आली. त्या सर्वांचा पगार एकसारखा असतो.

त्यांनी प्रतिमहा 2.55 लाख पगार मिळतो. आरबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 जून 2019 पासून 31 डिसेंबर 2019 पर्यंत कोणाचीही ग्रॉस सॅलरी बदलणार नाही. तीन वर्षांपूर्वी आरबीआचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि इतर डिप्टी गव्हर्नरचा पगार सरकारने दुप्पटीहून आधिक केला होता. त्यांची बेसिक सॅलरी क्रमश 2.50 लाख आणि 2.25 लाख रुपये होती.

आरबीआयच्या तुलनेत खासगी बँक अधिकाऱ्यांचा पगार 
आरबीआयच्या गव्हर्नरच्या तुलनेत देशातील मोठ्या खासगी बँकांच्या एमडी आणि सीईओची सॅलरी आधिक असते.HDFC चे एमडीला सध्या 90 लाख रुपये प्रति महिन्याच्या दराने ग्रॉस सॅलरी मिळते. यात ईसॉप्स आणि इतर इंसेंटिव्हचा समावेश नाही. तर देशाची सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या चेअरमनला महिन्याला 2.46 रुपये प्रति महिना पगार मिळतो.

जगातील सर्वात मोठ्या बँक अधिकाऱ्यांच्या तुलनेत आरबीआयच्या गव्हर्नरचा पगार 
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या सेंट्रल बँक फेरडल रिझर्वच्या चेअरमनला वर्षाला 203.250 डॉलर (जवळपास 1.46 कोटी रुपये) मिळतात. तर बँक ऑफ अमेरिकाचे सीईओ यांना 1.5 मिलियन डॉलर (जवळपास 10.8 कोटी रुपये) वर्षाला मिळतात. म्हणजेच आरबीआय गव्हर्नरच्या पगाराच्या 10 पट आधिक जास्त.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like