दैनंदिन जीवनातील ‘या’ गोष्टी मार्च पर्यंत होणार स्वस्त ? RBI गर्व्हनर दास यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 4 ते 6 फेब्रुवारीपर्यंत झालेल्या बैठकीनंतर व्याज दरात कोणताही बदल झालेला नाही. दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कांद्याचे दर कमी झाले आहेत. जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये किमती आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. परंतु, डाळ, दूधाच्या वाढलेल्या किमती पुढेही सर्वसामान्यांसाठी तापदायक ठरणार आहेत. बजेटमध्ये झालेल्या इन्कम टॅक्स कपातीमुळे मागणी वाढू शकते. आरबीआय गव्हर्नर दास यांचे मत आहे की छोट्या कालावधीसाठी महागाई वाढू शकते.

कधी कमी होईल महागाई

रिझर्व्ह बँकेने जानेवारी ते मार्च या तिमाहीत महागाईत थोडी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, एप्रिल ते सप्टेंबर 2020 च्या दरम्यान खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या महागाईचा दर 5 ते 5.4 टक्के राहू शकतो. परंतु जानेवारीमध्ये सीपीआय इनफ्लेशन काय करते, यावर अंदाज व्यक्त करता येणार नाही.

खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या किंमतीचे दर वाढल्याने डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 7.35 टक्क्यांवर पोहोचला. हा साडेपाच वर्षातील सर्वात जास्त आहे.

रेपो रेटमध्ये कपात न झाल्याने सध्या होम लोनच्या दराम कोणताही दिलासा मिळालेला नाही. बहुतांश बँकांनी होम लोनचा दर रेपो रेटशी लिंक केला आहे. कारण रेपो रेटमधील कपातीचा फायदा त्यांना लवकर मिळावा. परंतु, यावेळी लोन घेणार्‍या ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

देशातील आर्थिक मंदी दूर होण्याचे संकेत : गव्हर्नर

मागील काही दिवसांपासून येत असलेल्या आर्थिक आकड्यांवरून हे स्पष्ट होते की, देशाची अर्थव्यवस्था हळूहळू रूळावर येत आहे. मंदीचे ढग कमी होत आहेत. त्यांनी म्हटले की, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टरच्या वाढीच्या आकड्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेक इकॉनॉमिक इंडिकेटर्स याबाबतीत संकेत देत आहेत की, देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे.

देशात सेवा क्षेत्रातील व्यवहारांमध्ये वाढ जानेवारीमध्ये 7 वर्षातील वरच्या स्तरात पोहचली आहे. आयएचएस मार्केट इंडिया सर्व्हिसेस बिजनेस अ‍ॅक्टिव्हिटी इंडेक्स जानेवारीमध्ये 55.5 अंकावर होता, तर डिसेंबरमध्ये तो 53.3 अंक होता. तसेच, मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय जानेवारीमध्ये 55.3 अंकावर होता. हा 2012 से 2020च्या कालावधीत उच्च स्तर आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये तो 52.7 अंकावर होता.