अच्छे दिन ! महागाई वाढण्याची ‘चिन्ह’ नाहीत : RBI गव्हर्नर शशिकांत दास

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारतीय रिजर्व बँकचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी देखील मान्य केले के देशाच्या GDP ची स्थिती चांगली नाही. ते म्हणाले की, 5 टक्के ग्रोथ रेट त्यांच्यासाठी देखील धक्कादायक आहे. सरकारने ग्रोथ वाढवण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. परदेशी गुंतवणूक मागील वर्षापेक्षा चांगली आहे. खाद्य तेलाच्या महागाई बाबत काळजी करण्याची गरज नाही, डाळ, भाज्या यांच्या किंमतीबाबत काळजी करायची देखील गरज नाही. फक्त शहरात दूध, अंड्यांच्या किंमती वाढल्या आहेत.

ते म्हणाले की GDP चे अनुमान खराब आहे. 5 टक्के जीडीपी असणे हैराण करणारे आहे. MPC ने इकोनॉमी मध्ये स्लोडाऊन मानले आहे. ग्रोथ मध्ये तेजी आणणे RBI ची प्राथमिकता आहे. MPC साठी ग्रोथ आता सर्वात मोठी प्राथमिकता आहे. परंतू निर्मिती क्षेत्रात कमी जाणवत आहे. GDP च्या अनुमान बांधण्याचा पद्धतीला सुधारले जात आहे.

शशिकांत दास यांनी सांगितले की, रेपो रेट कपातीवर आता काही बोलता येणार नाही. ग्रोथ वाढवण्यात सर्वच आपली भूमिका बजावातील. फक्त मॉनिटरी पॉलिसी काहीही करु शकत नाही. आता रेपो रेट मध्ये कपात करण्याबाबत कोणतीही शक्यता नाही.

शशिकांत दास म्हणाले की, खाण्या पिण्याच्या वस्तू कोणतीही वाढ होण्याची शक्यता नाही. डाळ, भाज्यांच्या किंमती सध्या स्तिर आहेत. काही वस्तूमधील किंमतीतील वाढ ग्रामीण भागासाठी योग्य ठरेल. अंडी आणि दूधाच्या किंमतीतील तेजी फक्त शहरावर परिणाम करणारी आहे.