RBI Governor Shaktikanta Das | 2000 रुपयांच्या नोटबंदीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले -‘…म्हणून नोटा बंद केल्या’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआय (RBI) कडून दोन हजार रुपयांच्या (2000 Rupees Notes) नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतल्यानंतर गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. दोन हजारांच्या नोटा चलनात आणण्याचे उद्दिष्ट आता पूर्ण झाले आहे, असं शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) म्हणाले, दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून त्या जामा केल्या जातील, यासाठी चांगली प्रणाली कार्यरत आहे. जेणेकरुन सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासाठी बँकांना पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहे. यावेळी एका पत्रकाराने 30 सप्टेंबरनंतर नोटेचे काय होणार असा प्रश्न विचारला. यावर बोलताना ते म्हणाले, 30 सप्टेंबर नंतर दोन हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर राहणार नाहीत, असे आम्ही काहीही म्हटले नाही, असे सांगितले.

ते पुढे म्हणाले, नोटाबंदीनंतर (Demonetization) काढलेल्या नोटांची भरपाई करण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या आता बाजारात अधिक मुल्यांच्या नोटांची कमतरता नसल्याने त्या वितरणातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन हजार रुपयांची नोट कायदेशीर निविदा राहील आणि ती 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकांमध्ये सहजपणे जमा केली जाईल आणि बदलली जाऊ शकते.

शक्तिकांत दास म्हणाले, दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्यात आल्या आहेत.
चार महिन्यांचा कालावधी देण्यात असून, लोक सहज नोटा बदलू शकतात. तुम्ही आरामात नोट बदलू घेऊ शकता.
चार महिने ही बाब गांभीर्याने घेण्याची वेळ आहे. नोटा बदलून घेण्यासाठी भरपूर वेळ आहे.
जुन्या नोटा बदलून देण्यावर घातलेल्या बंदीला अडचण मानू नका.
भारताची चलन व्यवस्थापन प्रणाली (Currency Management System of India) अतिशय मजबूत आहे.
पाचशेच्या आणखी नोटा चलनात आणण्याचा निर्णय जनतेच्या मागणीवर अवलंबून असल्याचे त्यांनी यावेळी
नमूद केले.

बँकांना दोन हजारांच्या नोटा बदलण्याचा डेटा तयार करावा लागेल आणि नोटांचा सर्व तपशील बँका तयार करतील.
तसेच दोन हजारांच्या नोटा बदलण्याची सुविधा ही सामान्यच असेल.
नोटा बदलू देण्यासाठी बँकांमध्ये देखील पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे आवाहन शक्तिकांत दास यांनी केले आहे.

Web Title :  RBI Governor Shaktikanta Das | what will happen to 2000 notes after september 30 rbi governor says

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘आमचा 19 आकडा कायम राहील, पण…’, ठाकरे गटाने स्पष्टच सांगितलं

Jayant Patil ED Inquiry | ‘2024 नंतर ईडी कार्यालयात कोणाला पाठवायचे, याद्या तयार करायला घेतल्या’, जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवरुन ठाकरे गटाचा इशारा

Sameer Wankhede | अतिक अहमदसारखं माझ्यासोबत घडू शकतं, समीर वानखेडेंनी केली ‘ही’ मागणी