पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रिझर्व्ह बँकेत शेकडो नोकर्‍या, आजच करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI Grade B Recruitment 2021: पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) GRADE-B Officer या पदाच्या शेकडो रिक्त जागांवर भरती सुरू केली आहे. पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारक असे दोन्ही प्रकारचे उमेदवार या पदांसाठी पात्र असतील. RBI GRADE-B पदाचा तपशील, नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अर्जांची लिंक सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पदांचा तपशील-
१. ऑफिसर ग्रेड-बी (General) – २७० पदे
२. ऑफिसर ग्रेड-बी (DEPR) – २९ पदे
३. ऑफिसर ग्रेड-बी (DSIM) – २३ पदे
पदांची एकूण संख्या – ३२२

वेतनश्रेणी-
-आरबीआय ऑफिसर ग्रेड-बी (General) साठी कोणत्याही विषयात किमान ६० टक्क्यांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. SC, ST दिव्यांगांसाठी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक. किंवा कोणत्याही विषयात किमान ५५ टक्के गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे.

-ऑफिसर ग्रेड बी (DEPR/DSIM) साठी – संबंधित क्षेत्रातील मास्टर डिग्री किंवा पीजीडीएम (Post Graduate Diploma) केलेला असावा.

वयोमर्यादा-
किमान- २१ वर्षे आणि कमाल-३० वर्षे
MPhil,Ph.D. उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान-३२ वर्षे , कमाल-३४ वर्षे.
आरक्षित वर्ग वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.

अर्ज कसा कराल-
रिझर्व्ह बँकेच्या या भरतीसाठी आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया २८ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२१ आहे.

निवड प्रक्रिया-
या पदांवरील भरतीसाठी ३ टप्प्यात परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत.

पद आणि परीक्षांच्या तारखा-
ऑफिसर ग्रेड-बी (General)- पहिला टप्पा- ६ मार्च २०२१, दुसरा टप्पा- १ एप्रिल २०२१
ऑफिसर ग्रेड बी (DEPR/DSIM) पहिला टप्पा- ६ मार्च २०२१. दुसरा टप्पा- ३१ मार्च २०२१.