ATM आणि क्रेडिट कार्डच्या व्यवहारांसाठी RBI नं आणली नवीन सिस्टीम, कार्डच्या डिटेल्सची गरज नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करताना ते सुरक्षित व्हावेत यासाठी नवीन व्यवस्था तयार केल्याची माहिती दिली. यामुळे ग्राहकांना आपल्या कार्डची माहिती कोणाला देण्याची गरज भासणार नाही, ग्राहकांच्या खऱ्या माहितीला एका यूनिक कोडमध्ये म्हणजेच टोकनमध्ये बदलण्यात येईल. यामाध्यमातून ग्राहक थर्ड पार्टी अ‍ॅप क्विक रेस्पाँस (QR) किंवा पॉइंट ऑफ सेल (POS) वर काॅंटेक्टलेस पेमेंटच्या माध्यमातून वापरता येईल.

काय आहे RBI ची टोकनायजेशन पेमेंट सिस्टिम –

RBI च्या अहवालानुसार, टोकनायजेशन प्रोसेस अंतर्गत एक यूनिक टोकन नंबर बँकद्वारे ग्राहकांना पेमेंटच्या वेळी देण्यात येईल. यानंतर ग्राहक कार्डची खरी माहिती देण्याऐवजी हा टोकन नंबर देऊन पेमेंट करु शकतात. सध्या ही सुविधा फक्त मोबाइल आणि टॅबलेटवर मिळेल, भविष्यात ती वाढवण्यात येईल.
नव्या व्यवस्थेत कोणीही व्यवसायिक ओरिजिनल डेबिट क्रेडिट कार्ड नंबर मागू शकणार नाही, याजागी 16 अंकी डिजिटल पेमेंट अकाऊट नंबर बँक द्वारे देण्यात येईल.

 

यानंबरचा ग्राहक वापरु शकतील, प्रत्येक ट्रान्जेक्शनला हा नंबर बदलण्यात येईल. ऑनलाइन शॉपिंगवेळी हाच नंबर ग्राहकांना टाकावा लागेल, परंतू तेथे पिन टाकणे आवश्यक आहे.

ग्राहकांना काय होणार फायदा –

1. ग्राहकांना ही सेवा पूर्णता मोफत देण्यात आली आहे. ग्राहक ठरवेेल की त्याला या सेवेचा लाभ घ्यायचा आहे की नाही. ही टोकन सेवा अनिवार्य नसेल.

2. ग्राहकांकडे कोणत्याही सेवेसाठी रजिस्टर करणे, डी रजिस्टर करणाचे आधिकार असतील.

3. टोकनायज्ड कार्ड ट्रान्जेकशनच्या माध्यामतून होणारे व्यवहार ग्राहक लिमिटेड करुन घेऊ शकतो.

4. मोबाइल, टॅबलेट हरवल्यास तक्रार दाखल करता येईल याने अनाधिकृत व्यवहारांवर रोख लावता येईल.

कशी सुरक्षित असे टोकन व्यवस्था –
यानंतर ग्राहकांना आपल्या कार्डची माहिती कोणत्याही थर्ड पार्टी अॅपबरोबर शेअर करण्याची गरज नाही. पहिल्यांदा ही माहिती ग्राहकांना द्यावी लागत होती, ज्याने चोरी होण्याच्या शक्यता वाढत होत्या. यानंतर ग्राहकांना फक्त टोकन नंबर देणे गरजेचे असेल.

आरोग्यविषयक वृत्त –