खुशखबर ! RBI नं शॉपिंग संदर्भातील ‘हे’ 2 नियम बदलले, ग्राहकांना आता थेट फायदा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुम्हाला आता 2000 रुपयापर्यंतच्या ट्रान्झॅक्शनसाठी वन-टाइम-पासवर्ड (ओटीपी) ची गरज भासणार नाही. याशिवाय, आरबीआयने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट सुद्धा सादर केले आहे. यावर 10 हजार रुपयापर्यंतची शॉपिंग करता येऊ शकते. तुम्हाला देशातील मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या आणि मोबाईल अ‍ॅप ट्रान्झॅक्शनमध्ये वन-टाइम-पासवर्ड (ओटीपी) वापरण्याची गरज आता संपली आहे. ट्रान्झॅक्शन अधिक सोपे करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. आरबीआयने कंपन्यांना विना ओटीपी ऑनलाइन ट्रान्झॅक्शन सुविधा देण्याची परवानगी दिली आहे. कंपनी ग्राहकाला व्हेरिफाय करते त्याठिकाणी ही बाब लागू असणार आहे.

आरबीआयचा निर्णय
आरबीआय नियमांमध्ये हळूहळू सुट देत असल्याने विना ओटीपी ट्रान्झॅक्शन शक्य होणार आहे. आरबीआयने ट्रान्झॅक्शन अधिक सोपे करण्यासाठी बँकांना विना ओटीपी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनची मंजूरी दिली आहे.

आता काय होणार
आता ग्राहक ऑनलाइन शॉपिंग करताना लवकर ट्रान्झॅक्शन करू शकतात. फ्लिपकार्टने वीजा ही नवी सेवा सुरू केली आहे. या सेवेचे नाव वीजा सेफ क्लिक (व्हीएससी) आहे. या सेवेच्या मदतीने फ्लिपकार्टवर 2,000 रुपयांपर्यंतच्या ट्रान्झॅक्शनसाठी वन टाइम पासवर्डची गरज भासणार नाही.

10 हजार रुपयांच्या शॉपिंगसाठी सुद्धा नवी घोषणा
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) एक नवीन प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट (पीपीआय) सादर केले आहे. या पीपीआयद्वारे कमाल 10,000 रुपयांची खरेदी अथवा अन्य सेवांसाठी व्यवहार करता येईल. या पीपीआयमध्ये केवळ बँक अकाउन्टन द्वारेच पैसे टाकता येतील.

पीपीआयचा उपयोग डिजिटल देय रकमेसाठी होईल, ज्यामध्ये बिल भरणे, मर्चेंटचे बील भरणे, इत्यादी असेल. आरबीआयने म्हटले आहे की, डिजिटल भरणा वाढविण्यासाठी पीपीआय महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. पीपीआय एक फायनान्शीअल इंस्ट्रूमेंट आहे, ज्यामध्ये अगोदरच पैसे टाकून ठेवता येतात. या पैशांनी वस्तू अथवा सेवा खरेदी करता येतात.

पीपीआयमधून मित्र अथवा नातेवाईक, इत्यादींना पैसे पाठवता येऊ शकतात. आता देशात तीन प्रकारचे काम पीपीआय करत आहे. सेमी क्लोज्ड सिस्टम पीपीआय, क्लोज्ड सिस्टम पीपीआय आणि ओपन सिस्टम पीपीआय असे हे तीन प्रकार आहेत. पीपीआयला कार्ड आणि मोबाइल वॉलेटच्या रूपात जारी केले जाऊ शकते.

आता देशात कार्यरत असलेल्या काही प्रमुख पीपीआयमध्ये पेटीएम, मोबिक्विक (सेमी क्लोज्ड सिस्टम पीपीआय), गिफ्ट कार्ड (क्लोज्ड सिस्टम पीपीआय), ट्रॅव्हल, डेबिट अथवा क्रेडिट कार्ड (ओपन सिस्टम पीपीआय) यांचा समावेश आहे.

पीपीआय बँक आणि विना-बँकिंग संस्था जारी करतील. आरबीआयने म्हटले, या पीपीआयमध्ये पैसे भरता येतील. आणि ते कार्ड अथवा इलेक्ट्रॉनिक रूपात जारी करता येऊ शकते.

यामध्ये पैसे बँक खात्यातूनच भरता येतील. अशा प्रकारे पीपीआयचा उपयोग केवळ वस्तु आणि सेवा खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो. शिल्लक पैसे पुन्हा खात्यात वळते करता येणार नाहीत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like