बॅंकेतून ‘RTGS’ करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ; पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ‘RBI’ ने बदलले नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RTGS ने (Real Time Gross Settlement) पैसे ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आरटीजीएसद्वारे पैसे दुसऱ्या खात्यात जमा करण्याच्या वेळेमध्ये १ जूनपासून बदल करण्यात येणार आहे. RBI ने आरटीजीएसद्वारे पैसे दुसऱ्या खात्यात जमा करण्याची वेळ दीड तासांनी वाढवली आहे. पूर्वी केवळ ४ पर्यंतच आरटीजीएसद्वारे पैसे ट्रान्सफर करता येत होते. आता सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही सुविधा चालू राहणार आहे.

मोबाईलमधून थेट बँक खात्यात तत्काळ पैसे हस्तांतर करण्याची ही डिजिटल प्रणाली लहान रकमांसाठी सध्या लोकप्रिय आहे RBI ने काढलेल्या अधिसूचनेनुसार, आरटीजीएसने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी दुपारी साडेचारपर्यंतचीच कालमर्यादा आहे. आता त्यात दीड तासांची वाढ होऊन सायंकाळी ६ पर्यंत ती चालू राहील. १ जून पासून ही प्रणाली कार्यन्वित होईल. अनेक आस्थापना, दुकाने, कार्यालये यांच्यासाठी ही आरटीजीएस प्रणाली लाभदायक ठरते.

RTGS बद्दल –
आरटीजीएसचा उपयोग प्रामुख्याने मोठ्या रकमेच्या हस्तांतरणासाठी होतो. कमीत कमी २ लाख रुपये या प्रणालीने पाठवता येतात, तर जास्तीत जास्त कितीही पैसे पाठविता येतात. त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. RTGS च्या माध्यमातून मोठमोठी देवाणघेवाण केली जाते. देशातील ९५% देवाणघेवाण याच प्रणाली मधून होते. ही प्रक्रिया जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे १९८५ पर्यंत केवळ ३ देश ही पद्धत वापरत असतं, पण आज जगातील १०० पेक्षा जास्त देश या प्रणालीचा वापर करतात. RTGS प्रणालीच्या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. या पद्धतीमध्ये OK बटण दाबल्यावर लगेच पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात.