खुशखबर ! ‘RTGS’ आणि ‘NEFT’ बाबत ‘RBI’चा मोठा निर्णय

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था – आरटीजीएस आणि एनईएफटी बाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाने अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. आगामी काळात बँकांना आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारावर आकारलेल्या शुल्काचा त्याग करावा लागणार आहे. म्हणजेच आगामी काळात आरटीजीएस आणि एनईएफटी करताना ग्राहकांना चार्जेस लागणार नाहीत.

डिजीटल व्यवहारांना यामुळे प्रचंड चालना मिळणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने हा निर्णय घेतल्यामुळे व्यापारी वर्गात मोठा आनंद आहे. मात्र, यावर अद्याप कुठल्याही बँकेची प्रतिक्रिया आलेली नाही. यापुर्वी आरटीजीएस आणि एनईएफटी करताना ग्राहकांकडून बँका अतिरिक्‍त शुल्क घेत होत्या. आरबीआयने बँकांना हा फायदा त्यांच्या ग्राहकांना देणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.