RBI Hike Repo Rate | रिझर्व्ह बँकेकडून सर्वसामान्यांना झटका ! कर्ज महागणार, व्याजदर वाढवला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – RBI Hike Repo Rate | रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ करुन सर्वसामान्यांना झटका दिला आहे. वाढती महागाई या पार्श्वभूमीवर आरबीआयने निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर बँकेचा रेपो दर (Repo Rate) 4.40 टक्के झाला असून सर्वच प्रकारची कर्ज महागण्याची शक्यता आहे. म्हणजेच कर्जाच्या व्याजदरात (RBI Hike Repo Rate) वाढ होणार आहे. याबाबत माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी आज दिली.

 

शक्तिकांत दास यांनी सांगितले की, ”देशात मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6.95 टक्के इतका वाढला होता. गेल्या 17 महिन्यांतील किरकोळ महागाईचा हा उच्चांकी दर ठरला. खाद्य वस्तूंच्या दरात झालेली प्रचंड वाढ महागाईचा पारा वाढण्यास कारणीभूत ठरली होती. त्यामुळे 2 ते 4 मे 2022 दरम्यान आरबीआयच्या पतधोरण समितीची (Credit Policy Committee) तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

8 एप्रिल 2022 रोजी बँकेने पतधोरण स्थिर ठेवले होते. पण, महागाईवर बारीक लक्ष ठेवून राहणार असल्याचे दास यांनी सांगितले.
म्हणजेच रशिया – युक्रेन (Russia – Ukraine) युद्धाचे परिणाम आता जाणवत आहेत.
या दरवाढीनंतर रेपो दर 4.40 टक्के झाला आहे. तर स्टॅंडिंग डिपाॅझिट फॅसिलीटी दर (Standing Deposit Facility Rate) 4.15 टक्के झाला आहे.
बँक रेट 4.65 टक्के आणि सीआरआर अर्धा टक्क्याने वाढून 4.50 टक्के झाला आहे.

 

आरबीआय दि रिपोर्ट ऑन करन्सी अ‍ॅण्ड फायनान्स फॉर दि इयर (The Report on Currency And Finance For The Year)
2021 – 2022 च्या अहवालामध्ये म्हटलं आहे की, कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची पीछेहाट झाली असून यातून पुन्हा कोरोनापूर्व स्थितीत येण्यासाठी अखंड प्रयत्न करावे लागणार आहेत.
अर्थव्यवस्थेची कोरोनापूर्व स्थिती दिसण्यासाठी आणखी कमीतकमी पंधरा वर्षे लागणार असून 2035 हे वर्ष त्यासाठी उजाडेल, असं निरीक्षण नोदंवलं आहे.

 

Web Title :- RBI Hike Repo Rate | rbi hike repo rate by 40 basis point

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा