RBI Imposes Penalty | आरबीआयकडून मुंबईतील या बँकेला तब्बल 79 लाखांचा दंड, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईतील एका बँकेवर (RBI Imposes Penalty) दंडात्मक कारवाई केली आहे. एनपीए (NPA) वर्गीकरणासह काही सूचनांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने बँकेवर 79 लाख रुपयांचा दंड (RBI Imposes Penalty) ठोठावला आहे. आरबीआयने अपना सहकारी बँकेवर (Apana sahakari Bank) हा दंड ठोठावला आहे.

आरबीआयने (RBI) म्हटले आहे की, बँकेच्या वैधानिक तपासणीत काही निर्देशांचे पालन न केल्याचे आढळून आले आहे.
बँकेने एनपीए वर्गीकरण (NPA classification), मृत वैयक्तिक ठेवीदारांच्या चालू खात्यातील ठेवींवर व्याज भरताना किंवा दावे निकाली काढताना,
शिवाय बचत बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक न राखल्याने दंडात्मक शुक्ल आकारण्याच्या निर्देशांचे पालन केले नाही.
बँकेची वैधानिक तपासणी 31 मार्च 2019 रोजी त्याच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात होती.
वरील निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड (RBI Imposes Penalty) का आकारला जाऊ नये याचे कारण विचारत आरबीआयने बँकेला नोटीस बजावली होती.

 

ग्राहकांवर काय होणार परिणाम ?

आरबीआयने म्हटले की, बँकेने नोटीसला दिलेले उत्तर, अतिरिक्त पूरक उत्तर आणि सुनावणी दरम्यान दिलेला तोंडी जबाब या बाबी विचारात घेतल्यानंतर बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आरबीआयने असेही म्हटले की, दंड नियामक अनुपालनाअभावी लावण्यात आला आहे आणि बँकेने त्याच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे ग्राहकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही.

अहमदनगर मधील बँकेला 13 लाखाचा दंड
आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या एका निवेदनात म्हटले आहे की,
कोलकाता येथील व्हिलेज फायनान्शियल सर्व्हिसेसवर केवायसी (KYC) नियमांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 5 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अहमदनगर येथील अहमदनगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला (Ahmednagar Merchant Co-operative Bank) 13 लाख तर अहमदाबादच्या महिला विकास सहकारी बँकेला (Mahila Vikas Sahakari Bank, Ahmedabad) 2 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Web Titel :- RBI Imposes Penalty | rbi reserve bank of india imposes 79 lakh rupees penalty on mumbai based apna sahakari bank, know the matter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकेत 91 जागांसाठी मोठी भरती; पगार 1.50 लाख रूपयांपर्यंत

SIM Card Portability | तुमचा मोबाइल नंबर फक्त 1 रुपयांत घरबसल्या पोर्ट करता येणार; जाणून घ्या नवा नियम

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 196 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी