रिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना झटका ! दुसऱ्या बँकेच्या एटीममधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार जादा शुल्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बँक आणि एटीएम (ATM) ऑपरेटरवर एटीएम डिप्लॉयमेंटसाठी होणारा खर्च आणि देखभाल खर्चासह सर्व भागधारक आणि ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे आता 10 जून पासून कोणत्याही दुसऱ्या बँकेच्या एटीएमद्वारे आर्थिक व्यवहार (Financial transactions) केल्यास ग्राहकांना 17 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. यापूर्वी इंटरचेंज शुल्क 15 रुपये होती. त्याचबरोबर सर्व बँकांच्या ग्राहकांना दरमहा मिळणाऱ्या मोफत एटीएम (ATM) ट्रांझॅक्‍शन नंतर द्यावा लागणाऱ्या ग्राहक शुल्काची कमाल मर्यादा देखील २० रुपयांवरुन वाढवून 21 रुपये करण्यात आली आहे.

जॉबच्या शोधात असणार्‍यांसाठी खुशखबर ! यंदा काळजी मिटणार, नोकरीची संधी मिळणार

अनेक वर्षांपासून खासगी बँका आणि व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर्स इंटरचेंज फीज वाढवून 15 रुपयांवरुन 18 रुपये करण्याची मागणी करत होते.
या शुल्क वाढीनंतर ग्राहकांच्या खिशावर याचा परिणाम झाला आहे.
याशिवाय फ्री लिमिटनंतर द्याव्या लागणाऱ्या शुल्कामध्येच ही वाढ झाली असून दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे महाग होईल.
भारतीय बँकांच्या संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी ऑगस्ट 2012 त्यानंतर 2014 मध्ये इंटरचेंज शुल्कात वाढ केली होती.
समितीने केल्या शिफारशीनंतरच इंटरचेंज आणि कस्टमर चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, केंद्रीय बँकेने गैर-आर्थिक व्यवहारासाठी फी 5 रुपयांवरून 6 रुपये केली असून हि शुल्कवाढ 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होईल.
हा आदेश कॅश रिसायकलर मशीनद्वारे केलेल्या व्यवहारांनाही लागू असेल.

Web Title : rbi increases atm interchange fee now withdrawing money from other banks atms will be costly know the details