RBI कडून PMC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा ! आता ‘एवढी’ रक्‍कम काढता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव बँकेच्या ग्राहकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. आता रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना पैसे काढण्याची मर्यादा वाढवली असून यापुढे ग्राहक आपल्या खात्यातून 25 हजार रुपये काढू शकणार आहेत. याआधी देखील बँकेने 1 हजार रुपयांवरून हि मर्यादा 10 हजार रुपये केली होती. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव बँकेच्या चेअरमनसह 14 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर ग्राहकांनी आपले पैसे खाण्याचा आरोप केला होता. त्यानंतर बँकेवर विविध निर्बंध लावण्यात आले आहेत.

बँकेने ग्राहकांना दिले आश्वासन
बँकेने मागील आठवड्यात ग्राहकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांचे पैसे सुरक्षित असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्व खातेधारकांचे पैसे देण्याइतपत पैसे बँकेकडे असल्याचे देखील बँकेने म्हटले आहे.

सात राज्यात बँकेच्या 137 शाखा
पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव बँकेच्या 7 राज्यांमध्ये 137 शाखा असून महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये बँकेच्या शाखा आहेत.

visit : Policenama.com