ATM संबंधित नियमात होणार ‘बदल’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने बैठकीत काही घोषणा केल्या आहेत. यंदाच्या रेपो रेटमध्ये कपात न करता सामान्यांसाठी काही मोठे निर्णय घेतले आहेत. आरबीआयकडून एटीएम मशीनसंबंधित मार्गदर्शक तत्वे आणि एक खास कार्ड लॉन्च करण्याचे संकेत दिले आहेत.

काय आहेत मार्गदर्शक तत्व
आरबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एटीएम सर्व्हिस प्रोव्हायडर्सला अत्यंत महत्वाची मार्गदर्शक तत्व जारी करण्यात येतील. एटीएम सेवेसंबंधित फ्रॉड रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

इकोसिस्टमच्या अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये बदलासह डिप्लॉयमेंटच्या प्रोसेसला मजबूती देण्यासाठी काही मोठ्या सुधारणा प्रविष्ठीत केल्या आहेत. याशिवाय पडताळणीसाठी, स्टोरेज, प्रोसेसिंग आणि संवेदनशील डाटाच्या ट्रांसमिशनवर कंट्रोल संबंधित सक्ती केली जाऊ शकते.

शॉपिंगसाठी नवे कार्ड
आरबीआयने प्रीपेड पेमेंट इंस्ट्रुमेंट (PPI) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. याद्वारे 10 हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू आणि सेवांचा लाभ घेता येईल. या कार्डला तुम्ही रिचार्ज करु शकतात. याचा वापर पेमेंट करण्यासाठी आणि इतर काही खरेदी करण्यासाठी होईल. हे कार्ड बँकेत रोख जमा करुन रिचार्ज करता येईल. तसेच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या मदतीने रिचार्ज देखील करता येईल. एका महिन्यात जास्तीत जास्त 50 हजार रुपयांचे रिचार्ज करता येईल. यासंबंधित माहिती आरबीआयकडून 31 डिसेंबर 2019 ला देण्यात येणार आहे.

सहकारी बँकासाठी अटी
सरकारी बँकांकडून देण्यात येणाऱ्या मोठ्या कर्जासाठी एक केंद्रीय डेटाबेस तयार करावा लागेल. लवकरच सहकारी बँकांसाठी रेग्युलेटरी नॉर्म तयार करण्यात येतील. आरबीआयने नुकतीच पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँकेवर 6 महिन्याची बंदी आणली आहे. या बँकेवर आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन आणि फसवणूक यासारखे आरोप लावण्यात आले आहेत.