‘ऑनलाइन’ बँकिंग आणखी सुरक्षित करण्यासाठी बदलाच्या तयारीत RBI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाइन बॅकिंगला आणखी सुरक्षित करण्यासाठी रिझर्व बँक प्रक्रियेत मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. यासाठी आरबीआय आणि अर्थ मंत्रालयाच्या अधिकार्‍यांमध्ये चर्चा झाली आहे. यासंबंधीत सूत्रांनी म्हटले आहे की, आतापर्यंत बँकिंगमध्ये ट्रांजक्शन वन टाइम पासवर्ड (ओटीपी) द्वारे पूर्ण होते. ही प्रक्रिया ऑनलाइन बॅकिंगमधील फसवणूक पूर्णपणे रोखण्यासाठी उपयोगी पडत नसल्याचे दिसत आहे. यासाठी रिझर्व बँक ट्रांजक्शन पूर्ण करण्यासाठी आणखी काही प्रक्रिया सुरू करण्याची तयारी करत आहे.

आरबीआयच्या प्रस्तावानुसार, यापुढे ट्रांजक्शन पूर्ण करण्यासाठी फेशियल रेकग्निशन, आयरिस आणि लोकेशन सारखी माहिती मागितली जाऊ शकते. याचा अर्थ असा आहे की, बँकिंग करणार्‍याला आता ट्रांजक्शन पूर्ण करण्यासाठी आपले लोकेशनसुद्धा सांगावे लागेल. बैठकीत अर्थ मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी रिझर्व बँकेला ऑनलाइन फसवणूकीवर प्रतिबंध घालण्याची विनंती केली होती. यानंतर केंद्रीय बँकेने याप्रकारच्या प्रस्तावावर विचार करण्यास सुरूवात केली आहे.

ऑनलाइन बँकिंगअंतर्गत ट्रांजक्शन पूर्ण करण्यासाठी सध्या टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2एफए) चा वापर केला जात आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर डेबिट किंवा क्रेडिट कार्डमधून ट्रांजक्शन पूर्ण करण्यात दोन सुरक्षा स्तरांचा वापर केला जातो, ज्यास 2एफए म्हटले जाते. पहिल्या स्तरात ग्राहकाकडून कार्डची डिटेल आणि सीव्हीव्ही नंबर इत्यादी माहिती घेऊन ट्रांजक्शन सुरू करण्याची मंजूरी दिली जाते. तर दूसर्‍या स्तरात ओटीपीची माहिती भरावी लागत आहे, जी ग्राहकाच्या संबंधित मोबाइल नंबरवर येते.

आरबीआयच्या आकड्यानुसार, देशात डिजिटल बँकिंगमध्ये लागोपाठ वाढ होण्यासोबतच ऑनलाइन फ्रॉडची संख्या सुद्धा वाढत चालली आहे. देशात डिजिटल व्यवहारात 13 टक्के वार्षिक दराने वाढ होत आहे, तर मोबाइल वॉलेटमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त वाढ होत आहे. 2019 मध्ये बँकिंग फ्रॉडमुळे 71,543 करोड रुपयांची फसवणूक झाली होती, तर मागील तिमाहीत ऑनलाइन बँकिंग फ्रॉडची 8,926 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये 18 सरकारी बँकांना सुमारे 1.17 लाख करोड रुपयांचे नुकसान झाले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like