×
Homeआर्थिकRBI | KYC बाबत आरबीआय कडून मोठी घोषणा! जाणून घ्या काय आहे...

RBI | KYC बाबत आरबीआय कडून मोठी घोषणा! जाणून घ्या काय आहे आरबीआयची ग्राहकांसाठीची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ही बातमी तुमच्या खूप कामाची असून याबाबतची घोषणा आरबीआयने (RBI) केली आहे. KYC संदर्भात आरबीआयने नवीन नियम अंमलात आणले आहेत. त्यामुळे हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. KYC साठी तुम्हाला दरवेळी ओरिजनल कागदपत्रांसोबत हजर रहावे लागते. मात्र आरबीआयने (RBI) जारी केलेल्या नवीन नियमामुळे तुमचे हे टेंशन दूर होणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्राहकांसाठी नवीन केवायसीसंदर्भातील एक महत्त्वाची सूचना ग्राहकांना दिली आहे. त्यामध्ये तुम्हाला आता KYC साठी बँकेत जाण्याची गरज लागणार नाही. जर तुम्हाला नवीन केवायसी करायची असेल किंवा जर तुमचे कागदपत्र मॅच होत नसतील तर तुम्हाला पुन्हा KYC करायला लागू शकते. याबाबतची माहिती यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्राहकांना दिली होती. यात त्यांनी ग्राहकांची माहिती अपडेट करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं. तुम्ही रि-केवायसी ऑनलाईन देखील करू शकतात. मात्र, ऑनलाइन रि-केवायसीमध्ये ग्राहकांना काही अडचणी येत असल्याची माहिती मिळाली आहे.

काय आहे रि-केवायसीची प्रक्रिया:

RBI ने दिलेल्या आदेशानुसार, बँकेत तुमच्या KYC चे अपडेट काही कालावधीनंतर अपडेट करण्यासाठी बँकेकडून सांगितलं जातं. तुमचं खातं सुरक्षित राहावं हा यामागचा उद्देश असतो. अशावेळी प्रत्येक वेळी तुम्हाला बँकेत जाऊन कागदपत्र दाखवून KYC करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे आरबीआयच्या या निर्णयाचे ग्राहकांकडून स्वागत होताना दिसत आहे.

तसेच, जर पहिल्यांदाच तुम्ही KYC केलं असेल तर नंतर रि-केवायसी करताना तुम्ही नेट बँकिंग किंवा तुम्ही बँकेत दिलेल्या Email चा वापर करू शकता. ग्राहक नोंदणीकृत ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम, डिजिटल चॅनेल (उदा. ऑनलाइन बँकिंग/इंटरनेट बँकिंग, मोबाइल अॅप्लिकेशन), लेटर्स इत्यादींचा वापर पुन्हा केवायसी करण्यासाठी करू शकतात, असं देखील RBI ने म्हटलं आहे.

तसेच आता केवायसीसंबंधी विविध बँकांनी देखील पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून व्हिडीओ केवायसीचा पर्याय देखील ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

व्हिडीओ केवायसी करण्यासाठी ग्राहकांना खाली दिलेल्या पायऱ्या विचारात घेऊन केवायसी करता येणार आहे:

तुम्हाला जर व्हिडीओ KYC करायचं असेल तर, तुमच्या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन व्हिडिओ केवायसीचा पर्याय
निवडू शकता. तिथे हा पर्याय उपलब्ध असेल तर त्यावर क्लिक करा.
तुमचा व्हिडिओ कॉल बँकेच्या एक्झिक्युटिव्हसोबत कनेक्ट केला जाईल.
तो तुम्हाला तुमची कागदपत्रं दाखवायला सांगेल. तुम्ही त्याला ऑनलाइन कागदपत्रे दाखवून केवायसी करू शकता.

त्याचबरोबर तुम्ही नेटबँकिंगद्वारे देखील बँक केवायसी करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:

काही बँका नेटबँकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन केवायसी सुविधाही उपलब्ध करून देतात.
नेट बँकिंगमार्फत केवायसीसाठी तुम्हाला बँकेच्या साईटवर लॉगइन करावं लागेल.
तिथे तुम्हाला KYC अपडेटचा पर्याय मिळेल. या सर्व मार्गांनी बँकेच्या खातेदारांना केवायसी करता येणार आहे.
त्यामुळे आरबीआयच्या या निर्णयाचे स्वागत खातेदारांकडून होत आहे.

Web Title :- RBI | kyc process how to video kyc online at home rbi issue guidlines

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | नाशिक पाठोपाठ ठाकरे गटाला परभणीत मोठा धक्का! एवढ्या नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश

Girish Mahajan | ‘त्या’ विधानाबाबत गिरीश महाजन यांनी मागितली माफी, म्हणाले- ‘तो उल्लेख अनावधानाने झाला’

Must Read
Related News