home page top 1

५० रुपयांची नवी नोट चलनात, आरबीआयची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने ५० रुपयांची नवी नोट चलनात आणली आहे. ५० रुपयांची नवी नोट चलनात आणली असली तरी, चलनात असलेल्या ५० रुपयांच्या जुन्या नोटांना कोणताही धोका नाही. नव्या नोटेसोबत जुन्या नोटाही पूर्ववतपणे चलनात राहतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. ५० रुपयांच्या इतर नोटांच्या डिझाईनप्रमाणे या नव्या नोटेवरही महात्मा गांधी यांची प्रतिमा आणि इतर गोष्टी आहेत.

या नोटेवर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही आहे. विशेष म्हणजे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या हस्ताक्षरातील ही पहिलीच नोट आहे. नोटबंदीनंतर सुमारे दोन वर्षांनंतर १८ ऑगस्ट २०१८ रोजी आरबीआयने निळ्या रंगाती ५० रुपयांची नोट चलनात आणली होती.

नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. तर रिझर्व्ह बँकेनेही बहुतांश नवीन नोटांचा भारतीय चलनात समावेश केला आहे. त्यानुसार, सर्वप्रथम, ५०० आणि २ हजारांच्या नव्या नोटा बाजारात आल्या. त्यानंतर २०० रुपयांची, ५० रुपयांची १० रुपयांची आणि आता १०० रुपयांची नवीन नोट बाजारात आली आहे. आता पुन्हा ५० रुपयांचीही नवी नोट चलनात आणली आहे. २०१६ च्या आरबीआयच्या वार्षिक अहवालातच या नोटांमध्ये होणाऱ्या बदलाचे संकेत देण्यात आले होते.

Loading...
You might also like