RBI MPC : कोरोनामुळे रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, 4% वर कायम राहणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्रीय बँकेच्या चलन धोरण समिती (एमपीसी) कडून प्रमुख दरांवर निर्णयांची घोषणा केली. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मॉनिटरी पॉलिसीत (Monetary policy) कोणताही बदल केला नाही. सतत वाढणार्‍या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने पॉलिसी रेटमध्ये  कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Coronavirus In India Updates : लागोपाठ कमी होत आहेत केस, देशात कोरोनाची 1.31 लाख नवी प्रकरणे, 2,706 लोकांचा मृत्यू

आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी (Monetary policy) कमिटीने निर्णय घेतला की, जोपर्यंत कोरोनाचा परिणाम संपत नाही तोपर्यंत अकोमडेटिव्ह दृष्टीच कायम ठेवली जाईल. म्हणजे कोरोना महामारीमुळे आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि रिकव्हरी जारी ठेवण्यासाठी सिस्टममध्ये लिक्विडीटी कायम राहील, यासाठी आरबीआयने RBI दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

रिव्हर्स रेपो रेटमध्ये बदल नाही
मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (एमएसएफ) आणि बँक रेट पहिल्याप्रमाणे 4.25 टक्केवर कायम राहतील. रिव्हर्स रेपो  रेटमध्ये सुद्धा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एमपीसीने रेपो रेट 4 टक्केवर कायम ठेवला आहे आणि रिव्हर्स रेपो रेटसुद्धा 3.35 टक्केवरच कायम ठेवला आहे.

ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

तीन दिवसांची बैठक
मॉनिटरी पॉलिसी कमिटीची (एमपीसी) तीन दिवसांची बैठक 2 जून रोजी सुरू झाली होती. पॉलिसीवर हा निर्णय अशावेळी आला आहे जेव्हा कोरोना व्हायरस संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम स्पष्टपणे दिसत आहे.

महत्वाचे मुद्दे
* रिव्हर्स रेपो  रेट 3.35%, एमएसएफ रेट 4.25% आणि बँक रेट 4.25% वर कायम ठेवला.
* आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत यांनी म्हटले,
जेवढी जास्त कठिण स्थिती असेल,
तिला पार करण्यात तेवढ्याच वेगाने पुढे जाण्यास मदत मिळेल.
* गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे म्हणणे आहे की,
चलन धोरण समितीने रेपो दर 4% वर विना बदल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत