RBI Monetary Policy | RBI पॉलिसीच्या या प्रमुख गोष्टी तुम्ही आवश्य जाणून घ्या, रेपो रेटमध्ये बदल केला का? वाचा सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  RBI Monetary Policy | भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (ShaktiKant Das) यांनी आज शुक्रवारी मॉनिटरी पॉलिसी (Monetary Policy) ची घोषणा केली आहे. केंद्रीय बँकेने यावेळी सुद्धा रेपो रेट (Repo rate) मध्ये कोणताही बदल केलेला नाही. तो पहिल्या प्रमाणेच 4 टक्केवर कायम ठेवला आहे. रेपो रेट त्यास म्हणतात, ज्या रेटवर आरबीआय कमर्शियल बँका आणि इतर बँकांना कर्ज देते.

RBI ने रिव्हर्स रेपो रेटमध्ये सुद्धा कोणताही बदल केलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट (Reverse repo rate) सुद्धा पहिल्या प्रमाणे 3.35 टक्केवर कायम राहिल. रिव्हर्स रेपो रेट तो असतो ज्यावर बँकांना आरबीआयमध्ये जमा फंडवर व्याज मिळते. तर, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट म्हणजे MSFR आणि बँक रेट 4.25 टक्के राहिल.

रिझर्व्ह बँकेचे गव्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटले की, पॉलिसीचा दृष्टीकोन अजूनही
accomodative राहिल. accomodative दृष्टीचा अर्थ आहे की,
आरबीआयचा फोकस रेट कमी ठेवून अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यावर आहे.
रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसीची प्रमुख बाबी जाणून घेवूयात…

महागाई दराचा अंदाज वाढला

आरबीआयने आर्थिक वर्ष 2022 साठी महागाई अंदाज 5.1 टक्केवरून वाढवून 5.7 टक्के केला.
फिस्कल ईयर 2022-2023 च्या पहिल्या तिमाहीत महागाई दर 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

GDP ग्रोथ 9.5 टक्के कायम

आरबीआयने फायनान्शियल ईयर 2021-22 साठी जीडीपी ग्रोथ अंदाज 9.5% वर कायम ठेवला आहे. शक्तिकांत दास यांनी म्हटले की, पॉलिसी रिव्ह्यूची प्राथमिकता ग्रोथ वाढवणे आणि अर्थव्यवस्थेच्या अडचणी दूर करणे आहे.
दास म्हणाले, अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत आहे.
तसेच Targeted Long-Term Repo Operations (TLTRO) स्कीमची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

 

Web Title : rbi monetary policy 6 august 2021 must know these main important things of rbi policy details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Traffic signal | ठाण्यात सिग्नल अभावी वाहतुकीचा खोळंबा; बिल न भरल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित

High Court | 15 वर्षांपुढील वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कार नाही; हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Governor Bhagat Singh Koshyari | ‘दुनिया में सबसे जादा ‘मीडिया’ से डर लगता है’