खुशखबर ! RBI नं दिलं दिवाळी गिफ्ट, व्याज दरात 0.25 % कपात, आता आणखी कमी होणार तुमचा EMI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या व्याजदरांमध्ये कपात केली असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. 0.25 टक्के रेपो रेटमध्ये कपात केली असून यामुळे कर्जदरामध्ये देखील कपात होणार आहे. त्याचबरोबर कर्जाचा हफ्ता देखील कमी होणार आहे. महागाईदर कमी होण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. त्याआधी ऑगस्टमध्ये देखील रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांची कपात केली होती. या आर्थिक वर्षात जिडीपी दर पाच टक्क्यांवर घसरला असून आरबीआयने यावर्षी चार वेळा रेपो रेटमध्येमध्ये कपात केली आहे.

काय आहे रेपो रेट –
ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतात त्या दराला रेपो रेट असं म्हणतात. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.

MPC म्हणजे काय ? –
mpc ची स्थापना 2016 मध्ये झाली होती. हि समिती आर्थिक विकास दराच्या योजना तसेच त्याचे नियंत्रण करण्याचे काम करत असते. तसेच महागाईवर देखील लक्ष ठेवण्याचे काम हि समिती करत असते. या समितीमध्ये आरबीआयच्या गव्हर्नरसह 6 सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये तीन सदस्य हे केंद्र सरकारचे तर तीन सदस्य हे आरबीआयचे असतात. यासमितीच्या सदस्यांचा कालावधी हा चार वर्षांचा असतो. तसेच आर्थिक नीती तयार करण्यासाठी देखील हि समिती करत असते.

visit : Policenama.com