खुशखबर ! RBI कडून सलग चौथ्यांदा रेपो दरात ‘कपात’, ‘घर’ आणि ‘वाहन’ कर्जाचे हप्ते व कर्जे स्वस्त, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून रेपो दरात कपात करण्यात आल्याने सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. रेपोच्या दरात कपात झाल्यानंतर रेपो दर आता ५.४० टक्क्यांवर आला आहे. पुर्वी रेपोचा दर हा ५.७५ टक्के एवढा होता. रेपोचे दर कमी झाल्यानंतर आता होम आणि अ‍ॅटो कर्जावरील व्याजदरात कपात होणार आहे. आरबीआयने रिव्हर्स रेपो दरात देखील कपात केली आहे. रिव्हर्स रेपो दर आता ५.१५ टक्क्यांवर आला आहे.

घर आणि वाहन कर्ज स्वस्त होणार असल्याने सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापुर्वी देखील रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून ३ वेळा रेपोचे दर कमी करण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फायदाच झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –