RBI नं घेतले 5 मोठे निर्णय ! ग्राहकांसाठी चेक, कॅश आणि कर्जाशी संबंधित नियम बदलले

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – आरबीआयने गोल्ड ज्वेलरीवर कर्जाची व्हॅल्यू वाढवली आहे. आता गोल्डवर 90 टक्केपर्यंत कर्ज मिळू शकते. आतापर्यंत सोन्याच्या एकुण व्हॅल्यूच्या 75 टक्के लोन मिळत होते. तुम्ही ज्या बँक किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनीत गोल्ड लोनसाठी अर्ज करता, ते अगोदर सोन्याच्या गुणवत्तेची तपासणी करतात. सोन्याच्या गुणवत्तेनुसार कर्जाची रक्कम ठरते. सामान्यपणे बँक सोन्याच्या मुल्याच्या 75 टक्के लोन देतात.

चेक पेमेंट सिस्टम
आरबीआयने चेक पेमेंट सिस्टममध्ये बदल करत यास आणखी सुरक्षित केले आहे. आरबीआयने 50000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तच्या व्यवहारावर नवी सिस्टम लागू केली आहे. या सिस्टम अंतर्गत चेक जारी करताना त्याच्या ग्राहकांद्वारे देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर चेक बँकेत क्लियर करण्यापूर्वी ग्राहकाशी संपर्क केला जाईल. या नव्या बदलात ग्राहकांसोबत फसवणूक रोखली जाऊ शकते. या पॉजिटिव्ह पे सिस्टम अंतर्गत लाभार्थीला चेक देण्यापूर्वी तुम्हाला चेकची माहिती, चेकच्या समोर आणि रिव्हर्स साईडचा फोटो बँकेला द्यावा लागेल.

ऑफलाइन रिटेल पेमेंट्स
आता कार्ड किंवा मोबाईल डिव्हाईसेसद्वारे डिजिटल पेमेंट्स इंटरनेटशिवाय सुद्धा करता येईल. रिझर्व्ह बँकेकने गुरूवारी डिजिटल ट्रांजक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफलाइन रिटेल पेमेंट्सचा एक पायलट स्कीमला मंजूरी देण्याची घोषणा केली आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत ज्या जागांवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही, तेथे सुद्धा डेबिट, क्रेडिट किंवा मोबाइल डिव्हाइसद्वारे व्यवहार केला जाऊ शकतो.

ओडीआर सिस्टम
देशात डिजिटल ट्रांजक्शन वेगाने वाढत आहे, या सोबतच समस्या सुद्धा वाढत चालल्या आहेत. फेल झालेल्या डिजिटल ट्रांजक्शनसाठी ऑनलाइन डिस्प्यूट रिजोल्यूशन (ओडीआर) सिस्टम अशा समस्यांच्या निरसन करण्यासाठी नवा उपाय असेल. प्राथमिक स्तरावर ऑथराइज्ड पीएसओ सिस्टम लागू करावी लागेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी स्टार्टअप्सला प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये सहभागी करण्यात आले आहे. या पावलाद्वारे स्टार्टअपला बँकांतून फंड जमवणे सोपे होईल. आतापर्यंत कृषी, एमएसएमई, शिक्षा, हौसिंग आदि यामध्ये होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी स्टार्टअप्सला प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये सहभागी केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like