खुशखबर ! RBI कडून नियमात बदल, ‘NEFT’व्दारे लवकरच दिवसात कधीही ‘फ्री’मध्ये पैसे ‘ट्रान्सफर’ करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेने सामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा दिला असून सप्टेंबर महिन्यापासून NEFT सेवा २४ तास पुरवली जाणार आहे. याआधी रिझर्व्ह बँकेने NEFT आणि RTGS वरील शुल्क रद्द करून सामान्यांना मोठा दिलासा दिला होता. सध्या NEFT आणि RTGS करण्यासाठी विशिष्ट वेळ देण्यात येत आहे.

डिजिटल ट्रान्जेक्शनला मिळणार वाव

डिजिटल ट्रान्जॅक्शनला वाव देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने NEFT आणि RTGS वर लागणारे शुल्क नुकतेच रद्द केले होते. त्याचबरोबर या निर्णयामुळे ग्राहकांना याचा फायदा मिळणार असून बँकांनादेखील ग्राहकांना सुविधा देणे सोपे होणार आहे.

या वेळेत करू शकता NEFT

सोमवार ते शुक्रवार या सकाळी ८ ते रात्री ७ वाजेपर्यंत तुम्ही हि सुविधा वापरू शकत होता. त्याचबरोबर शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत तुम्हाला हि सुविधा वापरू शकत होता. या निर्णयामुळे आता तुम्ही या दोन्ही सुविधा २४ तास वापरू शकता.

इतके लागतात ट्रान्जेक्शन चार्ज

देशातील सर्वात मोठी बँक असलेली एसबीआय १ रुपयांपासून ते ५ रुपयांपर्यंत होणाऱ्या व्यवहारासाठी ५ रुपयांपासून २० रुपयांपर्यंत शुल्क आकारते.

काय आहे NEFT

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर म्हणजेच एका बँकेतून दुसऱ्या बँकेत रक्कम पाठवण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धत आहे. या सुविधेद्वारे तुम्ही एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पैसे पाठवू शकता. एका व्यक्तीला किंवा कंपनीला देखील तुम्ही या सुविधेद्वारे पैसे पाठवू शकता.

आरोग्यविषयक वृत्त