पुढील महिन्यापासून तुमची बँक बदलतेय पैशाच्या व्यवहारासंबंधी ‘हा’ नियम, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्त संस्था – वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे डिसेंबरपासून तुमच्या बँकेच्या व्यवहाराशीसंबंधीत या नियमात बदल होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने रियल टाइम ग्रोस सेटलमेंट (आरटीजीएस) ला 24x7x365 उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. हा निर्णय डिसेंबर 2020 पासून लागू होईल. याचा अर्थ असा आहे की, आरटीजीएसच्या माध्यमातून चोवीस तास मनी ट्रान्सफर करू शकता. सध्या आरटीजीएस सिस्टम महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार सोडून आठवड्याच्या सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असते.

यासाठी घेतला निर्णय
आरबीआयनुसार, भारतीय आर्थिक बाजाराच्या जगतिक एकीकरणाच्या लक्ष्याला समर्थन देण्यासाठी चाललेल्या कामांना समर्थन देणे, भारताच्या अंतरराष्ट्री आर्थिक केंद्रांना विकसित करण्याचे प्रयत्न आणि स्थानिक कॉर्पोरेट आणि संस्थांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे भरण्याची फ्लेक्सिबिटी उपलब्ध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

खुप उपयोगी आहे आरटीजीएस सर्व्हिस
आरटीजीएसद्वारे तोबडतोब फंड ट्रान्सफर करता येतो. हे मोठ्या ट्रांजेक्शनसाठी उपयोगी आहे. आरटीजीएसद्वारे 2 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम ट्रान्सफर होऊ शकत नाही. ती ऑनलाइन आणि बॅकेच्या शाखेतून अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. यासाठी कोणतेही शुल्क नाही. परंतु शाखेत आरटीजीएस फंड ट्रान्सफर केल्यास शुल्क द्यावे लागते.

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोड आहे. यामध्ये एका अकाऊंटमधून दुसर्‍या अकाऊंटमध्ये पैशांचा व्यवहार केला जातो. इंटरनेट बँकिंगद्वारे या सुविधेचा लाभ घेता येतो. सोबतच बँकेत जाऊन सुद्धा याचा वापर करता येतो. एनईएफटीद्वारे काही वेळातच फंड ट्रान्सफर होतो. यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही. मात्र, ब्रँचमध्ये जाऊन ही प्रक्रिया केल्या शुल्क द्यावे लागते. ही सुविधा 24 बाय 7 सुरू असते.