‘ATM’ आणि ‘क्रेडिट कार्ड’च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर ‘हे’ नवे ‘नियम’ लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 सप्टेंबरपासून क्रेडिट – डेबिट कार्डवरुन पेमेंट करणे आता अधिक सोपे झाले आहे. RBI ने बँकांना आपल्या ग्राहकांना क्रेडिट आणि डेबिट कार्डवर ई – मॅंडेट सुविधा देण्यास सांगितले आहे. ही सुविधा छोट्या रक्कमेसाठी म्हणजेच नियमित होणाऱ्या ट्रांन्जेक्शनवर लागू होईल. हा नियम 1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. आतापर्यंत ही सुविधा सर्व बँक खात्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येत होती. ज्याअंतर्गत खातेधारकांना आपल्या खात्यातून एक निश्चित रक्कम महिन्याला डेबिट करण्याची परवानगी देण्यात आली होती.

यांना होणार सुविधेचा लाभ –

आता ही ई- मॅंडिट सुविधा सर्व प्रकारच्या डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटसाठी उपलब्ध असेल, RBI ने यासंबंधित सूचनेत सांगितले आहे की, डेबिट आणि क्रेडिट खातेधारकांच्या कोणत्याही ट्रांन्जेक्शनसाठी बँकेला तुम्हाला ई-मॅंडेट म्हणजेच तुमची परवानगी द्यावी लागेल. त्यानंतर निश्चित रक्कम तुमच्या खात्यातून डेबिट करता येईल.

ही सुविधा फक्त ट्रान्जेक्शन म्हणजेच नियमित होणाऱ्या ट्रान्जेक्शनसाठी उपलब्ध असेल. तुम्ही हे फक्त एकदा होणाऱ्या कोणत्याही ट्रान्जेक्शनसाठी वापरु शकत नाहीत.

तुम्हाला काय करावे लागेल –

तुम्हाला या सुविधेचा फायदा घ्यायचा असल्यास तुम्हाला त्यासाठी AFA (Additional factor of authentication) च्या वन टाइम रजिस्ट्रेशन प्रोसेसमधून जावे लागेल. ई – मॅंडेटवरुन पहिल्यांना रिकरिंग ट्रान्जेक्शन करण्यासाठी AFA वॅलिडेशन असणे आवश्यक आहे. ई – मॅंडिटमधून रिकरिंग ट्रान्जेकशन देखील त्याच कार्डासाठी असेल जे रजिस्टर्ड आहेत आणि त्यातून ऑथेंटिकेशननंतर पहिले ट्रान्जेक्शन झालेले असेल.