RBI Recruitment 2021 : ऑफिस अटेंडंटसाठी 841 जागा रिक्त

पोलिसनामा ऑनलाईन – रिझर्व्ह बँकेने बँकेच्या विविध कार्यालयांमध्ये ऑफिस अटेंडंटसाठी ८४१ पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ज्या १० वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी हवी आहे ते १५ मार्च २०२१ पर्यंत आरबीआय नॉन-सीएसजीच्या विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. म्हणजेच, आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. ज्या उमेदवारांनी आरबीआय भरती २०२१ मध्ये यशस्वीरीत्या अर्ज केला आहे. त्यांची ऑनलाईन परीक्षा ९ आणि १० एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने संबंधित राज्य/ केंद्रशासित प्रदेशातून दहावी उत्तीर्ण केले पाहिजे. जे भरती कार्यालयाच्या प्रादेशिक कार्यक्षेत्रात येतात. ही पात्रता त्या राज्य/ केंद्र शासित प्रदेशाच्या मान्यताप्राप्त मंडळाची असावी.

वयोमर्यादा
सामान्य/इडब्ल्यूएस – १० ते २५ वर्षे
एससी / एसटी – १८ ते ३० वर्षे
ओबीसी – १० ते २८ वर्षे

आरबीआय कार्यालयातील परिचारांची निवड प्रक्रिया
ऑनलाईन चाचणी आणि भाषा प्रवीणता चाचणी (एलपीटी) च्या आधारे केले जाईल.

अर्ज कसा करावा?
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जाऊन अपॉर्च्यूनिटी @RBI > चालू रिक्त जागा > जागांसाठी अर्ज करणे आणि ‘ऑनलाईन अर्ज भरणे’ यासाठी जाहिरात पृष्ठावरील हायपरलिंक ‘ऑनलाईन अर्ज’ वर क्लिक करा. असे केल्यानंतर उमेदवार ऑनलाईन नोंदणी पृष्ठावर पोहोचतील.

अर्ज फी
ओबीसी / इडब्ल्यूएस / सामान्य उमेदवार (चाचणी शुल्क/माहिती फी) ४५० रुपये
SC/ ST/PWBD/EXT( सूचना शुल्क ) ५० रुपये