RBI Recruitment 2021 : 10 वी पास उमेदवारांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 841 जागांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने ऑफिस अटेंडंटच्या पदावर 841 व्हॅकन्सी काढल्या आहेत. यामध्ये 454 पदे अनारक्षित आहेत. 211 पदे ओबीसी, 76 ईडब्ल्यूएस, 75 एसटी आणि 25 एससीसाठी आरक्षित आहेत. या पदांसाठी अधिकृत वेबसाइट rbi.gov.in वर जाऊन 15 मार्च 2021 पर्यंत अर्ज करता येईल. फी जमा करण्याची शेवटची तारीख सुद्धा 15 मार्च आहे. या पदांसाठी भरती परीक्षेचे आयोजन 9 आणि 10 एप्रिल 2021 ला होईल.

वयोमर्यादा –
* 18 वर्ष ते 25 वर्ष
* म्हणजे उमेदवाराचा जन्म 02/02/1996 च अगोदर आणि 01/02/2003 च्या नंतर झालेला नसावा.
* एससी, एसटीला कमाल वयोमर्यादेत पाच वर्ष आणि ओबीसीला तीन वर्षांची सूट मिळेल.

पात्रता –
* 10वी पास
* 1 फेब्रुवारी 2020 पर्यंत उमेदवार अंडरग्रॅज्युएट असावा.
* लक्षात ठेवा या भरतीसाठी ग्रॅज्युएट किंवा त्यापेक्षा जास्त पात्रता ठेवणारे उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.

वेतन –
* 10940-380 (4)-12460- 440(3) -13780-520(3)-15340-690 (2)-16720- 860(4) – 20160 – 1180 (3)- 23700 (20 वर्ष) आणि अन्य भत्ते

संपूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
https://www.livehindustan.com/pdf/rbi-office-attendant-notification-2021-3872790.html

निवड –
* ऑनलाइन लेखी परीक्षा व लँग्वेज टेस्ट

अर्जाची डायरेक्ट लिंक
https://ibpsonline.ibps.in/rbirpoafeb21/

अर्ज शुल्क –
* जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस- 450 रुपये
* एससी, एसटी, दिव्यांग – 50 रुपये