10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी RBI मध्ये नोकरीची उत्तम संधी, देशभरात केली जाणार भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शेकडो ऑफिस अटेंडंट पदांसाठी भरती काढली आहे. या पदांसाठी देशभरातील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. आपल्या क्षेत्रानुसार अर्ज करून आपण आरबीआयमध्ये सरकारी नोकरी मिळवू शकता. आरबीआयच्या या रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. यासाठी 24 फेब्रुवारी 2021 ते 15 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज केले जाणार आहे. तर 09 आणि 10 एप्रिल 2021 रोजी या पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.

ऑफिस अटेंडंट पदांसाठी क्षेत्रानुसार संख्या

कानपूर – 69 .

अहमदाबाद – 50

बंगळुरू – 28

भोपाळ – 25

भुवनेश्वर – 24

चंदीगड – 31

चेन्नई – 71

गुवाहाटी – 38

हैदराबाद – 57

जम्मू 09+

जयपूर – 43

कोलकाता – 35

मुंबई – 202

नागपूर – 55

नवी दिल्ली – 50

पटना – 28

तिरुवनंतपुरम – 26

एकूण पदांची संख्या – 841

पात्रता  –

या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव वयोगटांना जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येणार आहे.

अर्ज फी –

उमेदवारांना rbi.org.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल, यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. सर्वसाधारण, ओबीसी, ईडब्ल्यूएससाठी 450 रुपये. एससी, एसटी, दिव्यांग आणि माजी कर्मचार्‍यांनासाठी 50 रुपये.

वेतन –  दरमहा 10,940 ते 23,700 रुपये (या व्यतिरिक्त तुम्हाला इतर भत्ते वेतन मिळेल).

कशी निवड होणार –

उमेदवाराची निवड ऑनलाइन परीक्षा व लॅंग्वेज प्रोफिशियंसी परीक्षेच्या आधारे केली जाईल.