डेटा लीक प्रकरणी RBI ने दिले तपासाचे आदेश; चूक आढळल्यास कंपनीला दंड

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) डेटा लीक प्रकरणी सतर्क राहून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर फिनटेक स्टार्टअप mobikwik च्या ९.९ दशलक्ष भारतीय वापरकर्त्यांचा डेटा चोरल्याचा दावा हॅकर्सनी केला होता. यावरून वापरकर्त्यांचे मोबाईल नंबर, बँक खात्याचा डेटा, Email आणि क्रेडिट कार्ड क्रमांक यांचा यामध्ये समाविष्ट आहे, या प्रकरणावरून RBI ने तपासाचे आदेश दिले आहेत. तर यामध्ये कंपीनीची कोणतीही चूक आढळून आल्यास कंपनीकडून दंड आकारला जाईल असा इशाराही RBI ने दिला आहे.

डेटा चोरल्याचा दावा हॅकर्सनी केला यावरून कंपनीने खंडन केले होते.याप्रकरणी मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती. तर यानंतर डेटा हॅकिंगचा खुलासा सायबर सुरक्षा विश्लेषक (Cyber Security Analyst) राजशेखर रजहरिया यांनी केला होता. तसेच, मोबिक्विक या कंपनीमध्ये अमेरिकेची कंपनी सिकोईया कॅपिटल आणि भारतीय कंपनी Bajaj Finance यांचीही भागीदारी आहे. तर मोठ्या प्रमाणात डेटा लिक झाल्याचा दावा तज्ज्ञाकडून केला गेला होता.

असे RBI च्या सूत्राकडून सांगण्यात आले. तर RBI ला अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही वेतन सिस्टिमवर कमीतकमी ५ लाख रूपयांपर्यंत दंड आकारण्याचे अधिकार आहेत.

दरम्यान, ज्यावेळी डेटा लिक बाबत सर्वप्रथम माहिती देणाऱ्या सिक्युरिटी रिसर्चरच्याविरोधात कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती. परंतु या आठवड्यात काही युझर्सनं त्यांच्या क्रेडिट कार्ड सारख्या महत्त्वाची माहिती एका लिक्ड ऑनलाईन डेटाबेसमध्ये दिसत असून ती कथितरित्या मोबिक्विकशी जोडलेली असल्याची तक्रार काही युझर्सनं केली होती. तर RBI ने मोबिक्विकला इशारा दिला आहे आणि आदेश दिला की याच्या फॉरेन्सिक ऑडिटसाठी एका External auditor ला नेमलं जाणार असल्याचं म्हटलं आहे. जर लिकबद्दल माहिती निश्चित झाली तर RBI कंपनीला दंड करू शकते. आपण आपल्या युझर्सच्या माहितीच्या सुरक्षेला प्राधान्य देत असल्य़ाचं कंपनीने यापूर्वीच नमूद केलं होतं. आता कंपनीकडे १२ कोटी ग्राहक आहेत. भारतीय बाजारात मोबिक्विकची Paytm आणि Google Pay या सारख्या कंपन्यांशी स्पर्धा आहे. याआधी लिकबाबत राजहरिया यांनी RBI , Indian Computer Emergency Response Team, PCI मानके आणि Payment technology कंपन्यांनाही यादसंर्भात लेखी स्वरूपात याची माहिती दिली होती.

तसेच, आपला हेतू फक्त कंपनीकडून पैसे घेण्याचा असल्याचं या जॉर्डन डेवेन (Jordan Daven) या हॅकिंग समूहाने म्हटलं होत. पैसे मिळाल्यानंतर हा डेटा डिलीट केला जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मोबिक्विकनं मात्र या लिकच्या दाव्याला नकार दिला होता. कंपनी ग्राहकांच्या डेटाबाबत अधिक गंभीर आहे आणि सुरक्षा कायद्यांचं पूर्णपणे पालन करतं, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. मात्र, हॅकर समूहाने हा टेडा मोबिक्विकचा असल्याचा दावा केला होता. तसंच या ग्रुपने मोबिक्विक क्यूआर कोडची बरीच छायाचित्रे व ग्राहकांना जाणून घेण्यासाठी त्यांची कागदपत्रे आधार आणि पॅनकार्डसह अपलोड केली होती.

दरम्यान, संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत काम करत असल्याचं मोबिक्विकनं स्पष्ट केलं होतं. तसंच या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता तिसऱ्या पक्षामार्फत Forensic Data Security Audit करणार असल्याचंही कंपनीनं सांगितलं होतं. मोबिक्विकची सर्व खाती आणि त्यातील रक्कम पूर्णपणे सुरक्षित असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. जर तुम्हाला तुमचा अकाऊंट हँक झाल्याची शंका असेल तर https://cybernews.com/personal-data-leak-check/ यावर क्लिक करावं लागेल. यावर तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकून तुमची माहिती लीकबाबत सविस्तर सजमते.