BOI सह ‘या’ 2 सरकारी बँकांना मोठा झटका ! RBI ने लावला 6 कोटींपेक्षा जास्त दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय रिझर्व्ह बँकेच्या काही तरतूदींचे पालन न केल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाला पाच करोड रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. यामध्ये एनपीएशी संबंधित तरतुदींचा सुद्धा अंतर्भाव आहे. याशिवाय केंद्रीय बँकेने एनपीए नियमांचे पालन करण्यास असमर्थ ठरलेल्या कर्नाटक बँकेवर सुद्धा 1.2 करोड रूपयांचा दंड लावला आहे.

रिझर्व्ह बँकेने गुरूवारी आपल्या वक्तव्यात म्हटले की, त्यांनी केंद्रीय बँकेच्या निर्देशांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याने बँक ऑफ इंडिया (बीओआय) वर पाच करोड रूपयांचा दंड लावला आहे. हे उत्पन्न मान्यता, मालमत्ता वर्गीकरण आणि आगाऊशी संबंधीत तरतुदीं अंतर्गत येतात.

याची माहिती देताना रिझर्व्ह बँकेने म्हटले की, 31 मार्च, 2017 आणि मार्च, 2018 च्या आर्थिक स्थितीनुसार बीओआयच्या वैधानिक तपासणीमध्ये हे तथ्य समोर आले आहे की, बँकने काही निर्देशांचे पालन केलेले नाही. याबाबत बँकेला नोटीस दिली होती. नोटीसवर बँकचे उत्तर आणि व्यक्तीगत सुनावणीनंतर दंड लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशाप्रकारच्या प्रकरणात रिझर्व्ह बँकने कर्नाटक बँकेवर 1.2 करोड रूपयांचा दंड लावला आहे. केंद्रीय बँकेने उत्पन्न मान्यता आणि मालमत्ता वर्गीकरण (आयआरएसी) नियमांवर निर्देशांचे पालन न केल्यानेमुळे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेवर सुद्धा 30 लाख रुपयांचा दंड लावला आहे.