PMC नंतर ‘या’ बँकेवर RBI चे प्रतिबंध, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेने पीएमसी बॅंकेनंतर आता आणखी एका खासगी बँकेवर कारवाई केली आहे. लक्ष्मी विलास बँकेवर हि कारवाई करण्यात आली असून प्रॉम्प्ट करेक्टिव एक्शन या नियमांतर्गत त्यांच्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. यानंतर आता बँकांना PCA मध्ये टाकले असून जोपर्यंत या बँकेची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत या बँकेला नवीन कर्ज देण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत.

प्रकरण काय आहे ?
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेच्या डायरेक्टर्सवर फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांचा तपास सुरु असूनत्यांच्यावर 790 कोटी रुपयांचा घोटाळा करण्याचा आरोप करण्यात आला आहे. रेलिगेयर फिनवेस्ट या कंपनीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बँकेत 790 कोटी रुपयांची एफडी केली होती. यामध्ये घोटाळा करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बँकेच्या शेअर्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

PCA का टाकले लक्ष्मी विलास बँकेला –
या नियमांतर्गत रिझर्व्ह बँकेला ज्यावेळी वाटते की या बँकेकडे आता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पुरेसा निधी नाही. तसेच बँकेने दिलेले कर्ज परत नयेत नसेल तर बँकेला PCA मध्ये टाकले जाते. यामुळे जोपर्यंत या बँकेची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत या बँकेला नवीन कर्ज देण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत.

ग्राहकांचे काय होणार –
या निर्णयाचा ग्राहकांवर फारसा फरक पडणार नसून या निर्णयामुळे आता बँकेला कोणतीही नवीन शाखा उघडता येणार नाही. तसेच नवीन भरती देखील करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना काळजी करण्याचे काहीही कारण नसून त्यांचे पैसे सुऱक्षित राहणार आहे.

बँकेवर लागले हे प्रतिबंध –
आरबीआयने या बँकेला दुसऱ्या रिज कॅटेगरीमध्ये टाकले असून यामुळे बँकेला नवीन शाखा तसेच नवीन कर्ज देखील देता येत नाही. या बँकेबरोबरच देना बँकेवरच देखील नवीन कर्ज देण्यावर प्रतिबंध घातला आहे.

Visit : Policenama.com