RBI कडून PMC च्या ग्राहकांना मोठा दिलासा ! खात्यातून ‘एवढी’ रक्‍कम काढण्यास परवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जर तुम्ही पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह (PMC) बँकचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे. RBI ने PMC बँकेच्या ग्राहकांना खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा वाढवली आहे. नव्या नियमांनुसार पीएमसी बँकचे ग्राहक दररोज 10 हजार रुपये रक्कम काढू शकतील. पहिल्यांदा ही मर्यादा दिवसाला 1,000 रुपये इतकी होती. मंगळवारी RBI ने पुढील 6 महिन्यापर्यंत PMC बँकवर विविध निर्बंध लागले आहेत. RBI ने ही कारवाई बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट 1949 च्या सेक्शन 35 ए नुसार केली होती.

पीएमसी बँकेसंंबंधित RBI ने निर्णय घेतल्याने ग्राहकांच्या समस्या वाढल्या आहेत. त्यानंतर ग्राहकांकडून बँकेबाहेर आंदोलने करण्यात आली. काही ग्राहकांनी पोलिसात सामूहिक तक्रार केली. RBI च्या पीएमसी बँकेवर निर्बंधमुळे ग्राहक कोणतेही नवे खाते सुरु करु शकत नाहीत. याशिवाय ग्राहकांना नवे कर्ज देण्यावर देखील बंधने घालण्यात आले आहेत. आरबीआयचीचे हे निर्बंध पुढील 6 महिन्यांसाठी आहेत.

बँकेचे लायसन्स रद्द झाले आहे ?

RBI च्या निर्णयानंतर सोशल मिडियावर PMC बँकेचे लायसन्स रद्द झाल्याची चर्चा सुरु झाली होती, परंतू RBI ने हे स्पष्ट केले की निर्बंधामुळे हे समजणे चूकीचे आहे की PMC बँकचे बँकिंग लायसन्स रद्द झाले आहे.

बँकेच्या एमडीने मागितली माफी –

बँकेचे एमडी जॉय थॉमस यांनी ग्राहकांची माफी मागितली आहे. थॉमस म्हणाले की, मी याची जबाबदारी घेत आहे आणि खातेधाराकांना सुनिश्चित करतो की येत्या 6 महिन्यात आम्ही आमचे व्यवहार सुरळीत करु.
थॉमस म्हणाले की, मला माहित आहे की तुमच्या सर्वांसाठी हे अवघड असेल. कोणतीही माफी तुमची समस्या सोडवू शकत नाही. तुम्हा सर्वांना आवाहन आहे की तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावा.

Visit : policenama.com