पुण्यातील ‘या’ बँकेसह दोन सहकारी बँकांवर RBI ची कठोर कारवाई, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India (RBI) महाराष्ट्रातील एक आणि गुजरातमधील एक अशा दोन सहकारी बँकांवर (Cooperative Bank) दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये पुण्यातील राजगुरूनगर सहकारी बँक (Rajgurunagar Cooperative Bank Pune) आणि गुजरातमधील को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोट (Co-operative Bank of Rajkot) यांचा समावेश आहे. राजगुरूनगर सहकारी बँकेला 4 लाख रुपये आणि को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोटला 2 लाख रुपयांचा दंड आरबीआयकडून (RBI) ठोठावण्यात आला आहे.

 

रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या माहितीनुसार राजगुरू  सहकारी बँकेला व्याजदर आणि डिपॉझिटसंबंधी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. तर को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोटने जागरुकता योजनेसंबंधी नियमांची अवहेलना केली आहे. यामुळे या दोन्ही सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दंडात्मक कारवाई (Punitive Action) केली आहे.

 

दरम्यान, आरपीआयने या बँकांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल आल्यावर राजगुरुनगर सहकारी बँकेने मृत खातेधारकांच्या चालू खात्यामध्ये असलेली रक्कम त्यांच्या वारसांना सोपवली नव्हती. अशा परिस्थितीत वारसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आरबीआयने बँकेला याआधी नोटीस पाठवली होती. मात्र लेखी जबाबाने आरबीआयचे समाधान झाले नाही, तसेच आरबीआयने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली.

 

आरबीआयने म्हटले आहे की, हा दंड बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट (Banking Regulation Act) 1949 च्या कलम 56,
कलम 46(4) आणि कलम 47ए(1)(सी) अंतर्गत दोषी आढळल्याने ठोठावण्यात आला आहे.
यातील कुठल्याही देवाणघेवाणीचा ग्राहकांवर काहीही परिणाम होणार नाही.

 

Web Title :- RBI | rbi crackdown on two big co operative banks including this bank in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

State Anthem | सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा! महाराष्ट्राचे ‘राज्यगीत’ म्हणून ‘या’ प्रसिद्ध गीताची निवड

Sanjay Raut | संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांची न्यायालयाबाहेर भेट; खडसेंनी सांगितला भेटीचा किस्सा…

Pune Crime | ताडपत्री चोरण्याचा जाब विचारल्याच्या रागातून रॉडने मारहाण, कोंबडी पुलावरील घडना