RBI मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! 77 हजारापर्यंत पगार, जाणून घ्या पात्रता आणि अटीशर्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पहाणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे. आरबीआयमध्ये विविध पदांवर नोकर भरती निघाली असून ही भरती नॉन सीएसजी श्रेणीतील विविध पदांवर करण्यात येणार आहे. याचे नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 मार्च 2021 असणार आहे.

भरतीच्या महत्त्वाच्या तारखा

–  ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात – 23 फेब्रुवारी 2021

–  ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2021, संध्याकाळी 6 पर्यंत

–  अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 10 मार्च 2021

–  परिक्षेची तारीख – 10 एप्रिल 2021

वेतन श्रेणी

–  लीगल ऑफिसर ग्रेड बी – 77 हजार 208 रुपये

–  मॅनेजर – 77 हजार 208

–  असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) – 66 हजार 172 रुपये

–  असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी) – 63 हजार 172

अर्ज शुल्क

सर्वसामान्य, ओबीसी, पीडब्ल्युडी वर्गातील उमेदवारांसाठी – 600 रुपये
एसटी, एससी वर्गातील उमेदवारांसाठी – 100 रुपये

पद संख्या

–  लीगल ऑफिसर ग्रेड बी -11 पदे

–  मॅनेजर (टेक्निकल सिव्हील) – 01 पद

–  असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) – 12 पदे

–  असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी) – 5 पदे

–  एकूण पदे – 29

शैक्षणिक पात्रता

–  लीगल ऑफिसर ग्रेड बी – या पदासाठी उमेदवाराकडे कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

–  मॅनेजर (टेक्निकल सिव्हील) – या पदासाठी सिव्हील इंजिनियरिंगमध्ये पदवी आणि 3 वर्षाचा अनुभव

–  असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) – या पदासाठी इंग्रजी आणि हिंदी भाषेतून द्वितीय श्रेणीची पदवी आवश्यक

–  असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी) – या पदासाठी उमेदवाराकडे लष्कर, नौदल किंवा हवाई दलामध्ये किमान 5 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.