RBI Recruitment 2021 : रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 241 पदांवर भरतीसाठी अर्ज मागितले आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवारदेखील या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2021 निश्चित करण्यात आली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार www.rbi.org.in वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ( RBI) अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत सुरक्षा रक्षकाच्या 241 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

सुरक्षा रक्षकासाठी भरती पदांचा तपशील –
सर्वसाधारण प्रवर्गासाठी – 113 पदे
अनुसूचित जमाती – 32 पद
एसटी वर्गातील – 33 पद
ओबीसी वर्गासाठी – 45 पदे
ईडब्ल्यूएस वर्गासाठी -18

शैक्षणिक पात्रता:
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावे. तसेच ज्या उमेदवारांनी पदवी प्राप्त केली आहे किंवा त्यापेक्षा जास्त अभ्यास केला आहे अशा उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. यासाठी 25 वयाच्या ते 45 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. वयानुसार 01 जानेवारी 2021 रोजी वय मोजले जाईल.

महत्वाच्या तारखा …
ऑनलाईन अर्जाची सुरूवात – 22 जानेवारी 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 12 फेब्रुवारी 2021
अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2021
ऑनलाईन परीक्षेसाठी अंदाजे वेळ – फेब्रुवरी / मार्च 2021
आरबीआय सिक्युरिटी गार्डसाठी 241 पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांचे वेतनमान दरमहा 10940 रुपये असेल.

अर्ज फी:
या भरतीसाठी उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून 50 रुपये द्यावे लागतील. जे नॉन- रिफंडेबल असेल. कर्मचारी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज फी भरावे लागणार नाही. ऑनलाईन चाचणी व शारीरिक चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.