RBI Repo Rate Hike | रेपो रेटमध्ये 4 महिन्यात तिसऱ्यांदा वाढ, दास यांच्या घोषणेनंतर 5.40 टक्क्यांवर पोहचला; RBI च्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) गुरुवारी पुन्हा एकदा रेपो दरात वाढ (RBI Repo Rate Hike) करण्याची घोषणा केली आहे. आता रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्स वाढ (Basis Points Increase) करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. मे महिन्यात रेपो दरात अनपेक्षित 40 बेसिस पॉईंट्स आणि जूनमध्ये 50 बेसिस पॉइंट्स वाढ केल्यानंतर आरबीआयने केलेली ही तिसरी वाढ (RBI Repo Rate Hike) आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने आपलं घर आणि कार कर्जासारख्या इतर कर्जाच्या ईएमआयमध्ये (EMI) वाढ होईल.

 

जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत रेपो दरात ही सलग तिसरी वाढ (RBI Repo Rate Hike) आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikanta Das) यांनी ऑगस्टमध्ये चलनविषयक धोरण समितीच्या (Monetary Policy Committee) बैठकीनंतर आज रेपो दरात वाढ केल्याची माहिती दिली. चलनवाढ दशकभराच्या उच्चांकावर आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे.

 

 

शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रवास मंदीकडे
भारतीय अर्थव्यवस्थेवरही (Indian Economy) भू-राजकीय परिणामांचा प्रभाव
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत
महागाई कमी होताना दिसतेय
यंदा मान्सून सामान्य सरासरीपेक्षाही चांगला होत आहे. त्याचे परिणामही चांगले दिसतील.
रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ, नवीन दराच्या घोषणेनंतर रेपो रेट 5.40 टक्क्यांवर, तात्काळपणे व्याज दर लागू
एसडीएफ (SDF) दर 5.15 टक्क्यांवर, तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (Marginal Standing Facility) दर 5.15 टक्क्यांवर, तात्काळ व्याज दर लागू
सध्या सरु असलेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज
मान्सून सामान्य राहिला तर कच्चा तेलाच्या किंमती 105 डॉलर प्रति बॅरल राहिल्यास चालू आर्थिक वर्षात महागाई दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज
भारतीय रुपयात होत असलेली घसरण ही डॉलर मजबूत होत असल्यामुळे होत आहे. अन्य देशांच्या चलनाच्या तुलनेत रुपयाची घसरण कमी आहे. आरबीआयच्या धोरणामुळे रुपयाच्या घसरणीवर लगाम
पहिल्या तिमाहीत देशात 1360 कोटी डॉलरची परदेशी गुंतवणूक आली.

 

रेपो रेट म्हणजे काय ?

रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात वाढ होणे.
तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.
म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दर ही वाढवावे लागतात.
तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

 

Web Title :- RBI Repo Rate Hike | rbi hikes repo rate by half a percentage point increase in loan installments again

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा