RBI Repo Rate | आरबीआयकडून कर्जदारांना मोठा दिलासा; रेपो रेट ‘जैसे थे’, गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले…

नवी दिल्ली – RBI Repo Rate | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने Reserve Bank of India (RBI) कर्जदारांना एक मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो रेट (RBI Repo Rate) जैसे थे ठेवले आहेत. रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करता रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे व्याजदर जैसे थे राहणार आहेत. आरबीआयकडून गुरूवारी पतधोरण जाहीर करण्यात आले.

 

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून महागाई दरात घट झाली असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेट (RBI Repo Rate) वाढणार नसल्याची घोषणा केली. कमिटीच्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचेही गव्हर्नर दास यांनी सांगितले. आरबीआयच्या पतधोरण समितीकडून अपेक्षेप्रमाणे सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. रेपो रेट 6.50 टक्के कायम ठेवण्याचा आरबीआयच्या पतधोरण समितीने निर्णय घेतला.

 

 

ट्विट पहाण्यासाठी क्लिक करा

 

 

आरबीआयने गेल्या वर्षामध्ये 2.50 टक्क्यांनी वाढ करत रेपो रेटमध्ये बदल केले होते. मात्र चालू आर्थिक वर्षात विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर चालू आर्थिक वर्षात महागाई दर 5.1 टक्के राहण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यातील महागाई दर 4.7 टक्के जो मागील वर्षातला सर्वात कमी आहे.

 

सर्वसामान्यांना दिलासा –

सध्या रेपो रेट 6.50 टक्के इतके आहे. अनेक अर्थतज्ज्ञांनी सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता रेपो रेट आहे तितकेच राहतील, अशी शक्यता व्यक्त केली होती. आरबीआयच्या या निर्णयामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज घेतलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेपो रेट जैसे थे ठेवल्याने कर्जाचे हफ्ते वाढणार नाहीत. पुढील पतधोरण निश्चित होईपर्यंत कर्जाच्या हफ्त्यांमध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याने सर्वासामान्यांचा दिलासा मिळाला आहे.

 

2023-24 मध्ये महागाई दर राहण्याचा अंदाज –

– पहिल्या तिमाहीत 4.6 टक्के
– दुसऱ्या तिमाहीत 5.2 टक्के
– तिसऱ्या तिमाहीत 5.4 टक्के
– चौथ्या तिमाहीत 5.2 टक्के

 

Web Title :  RBI Repo Rate | rbi keeps the repo rate unchanged at 6,5 announces
rbi governor shaktikanta das rbi monetary policy committee

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा