…म्हणून 500, 200 आणि 2 हजारांच्या नोटांवरील रंग होतोय फिकट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँकेच्या RBI अहवालात चलनी नोटा खराब होण्याचे कारण कोरोना असल्याचे म्हंटले आहे. कोरोच्या दोन वर्षाच्या काळात चलनी नोटांचा रंग फिकट होणे आणि खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये २ हजार, ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. अहवालानुसार २ हजारांच्या केवळ ६ लाख नोटा २०१८-१९ मध्ये खराब झाल्या होत्या परंतु २०२०-२१ मध्ये तब्बल ४५.४८ कोटी नोटा खराब झाल्या आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी नोटा खराब होण्याचे प्रमाण ७५० टक्क्यांनी वाढलं आहे. तर २०१८-१९ मध्ये रिझर्व्ह बँकेकडे RBI २०० रुपयाच्या केवळ १ लाख नोटा खराब अवस्थेत परत आल्या होत्या. तेच प्रमाण २०२०-२१ मध्ये ११.८६ कोटी इतकं झालं. ते ११८६ पटीनं जास्त आहे. ५०० रुपयांच्या नोटा खराब होण्याचं प्रमाण ४० पटीनं वाढलं असून कमी मूल्य असलेल्या नोटांमध्ये हे प्रमाण अर्ध्या टक्क्यांनी वाढलं आहे.

२०१९ च्या अखेरपासून लोकांच्या मनात कोरोनाची भीती होती. त्यातच कोरोनाचा संसर्ग नोटांमधून होतो अशी अफवा पसरली तेव्हापासून लोकांनी इतर गोष्टींसारखे नोटाही सॅनिटायजेशन करण्यास सुरुवात केली. काहींनी तर चक्क नोटा धुवून इस्त्रीने त्या प्रेस केल्या. त्यामुळे नोटा खराब झाल्या तसेच रंगही फिकट झाले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन हजारांच्या नोटा अडीच पटीनं, ५००-२०० रुपयांच्या नोटा साडेतीन पटीने खराब झाल्या आहेत.

फायद्याची गोष्ट ! फक्त 5 हजार गुंतवून 50 हजार कमवण्याची संधी ! सुरू करा ‘हा’ बिझनेस, मोदी सरकार सुद्धा करेल मदत; जाणून घ्या

पंजाब नॅशनल बँक वर्कर्स युनियनचे महामंत्री कमलेश चतुर्वेदी म्हणाले, कोरोना संक्रमणाच्या भीतीने लोकांनी नोटा सॅनिटायज केल्या. काहींनी साबणाने धुतल्या. त्यामुळे नोटा खराब झाल्या. जास्त मूल्य असलेल्या नोटा लोकांनी सॅनिटायज करून खूप दिवस ठेवल्या त्यामुळे त्या नोटांचेही रंग फिकट होऊ लागले आहे. हेच मुख्य कारण नोटा खराब होण्यामागे आहे. दुसरीकडे कमी मूल्याच्या नोटा खराब होण्याचे प्रमाण कमी आहे कारण या नोटा एकमेकांकडे जात होत्या. त्याला हवाही लागत होती.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार खराब बँक नोटा ज्या संपुष्टात आल्या (लाखांची संख्या)

नोट         २०१८-१९      २०१९-२०        २०२०-२१
२०००           ०६              १७६८            ४५४८
५००           १५४              १६४५            ५९०९
१००         ३७९४५         ४४७९३          ४२४३३
५०             ८३५२          १९०७०          १२७३८
२०          ११६२६            २१९४८         १०३२५
१०          ६५२३९           ५५७४४          २१९९९
५               ५९१             १२४४             ५६४
२००           ०१                 ३१८           ११८६

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून