आता रोख पैसे जवळ ठेवायची गरज नाही! RBI ने केली Digital Rupee ची सुरुवात

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India (RBI) आजपासून डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार असून 9 बँकांची यासाठी निवड करण्यात आली आहे. आरबीआयने (RBI) लवकरच डिजिटल रुपयाचे पायलट लाँचिंग सुरू करणार असल्याचे म्हटले होते त्याप्रमाणे 1 नोव्हेंबरपासून त्याची सुरुवात झाली आहे.

आरबीआयचे स्वतःचे डिजिटल चलन प्रत्यक्षात आले असून 1 नोव्हेंबरपासून या व्यवहारांसाठी डिजिटल फॉर्म लाँच केले आहेत. सध्या प्रायोगिक तत्वावर हे सुरू केले आहे. यामुळे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होईल, पेमेंट सिस्टिम अधिक सक्षम होईल आणि मनी लॉन्ड्रिंगला (Money Laundering) आळा बसेल. डिजिटल फॉर्मचा वापर सरकारी सिक्युरिटीजच्या सेटलमेंटसाठी केला जाईल, असे आरबीआयने म्हटले आहे.

या प्रकल्पासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank of India (एसबीआय SBI), बँक ऑफ बडोदा Bank of Baroda (बीओबी BOB), युनियन बँक (Union Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) आणि एचएसबीसी बँक (HSBC Bank) या 9 बँकांचा समावेश केला आहे.

देशात आरबीआयचे (RBI) डिजिटल चलन Digital Currency (ई-रुपी) लागू झाल्याने आता रोख रक्कम जवळ बाळगण्याची गरज नाही. ते मोबाइल वॉलेटमध्ये ठेवू शकता आणि या डिजिटल चलनावर आरबीआयचे लक्ष राहील.

रिटेल ई रुपया हा सर्वांसाठी असून यामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतात किंवा ते पैसे घेऊन वापरू शकतात.
होलसेल ई रुपयासाठी मात्र काही अटी आणि नियम असणार आहेत.
निवडक वित्तीय संस्थांसाठी होलसेल ई-रुपी उपलब्ध असेल.

ई-रुपी डायरेक्ट मॉडेल आणि अप्रत्यक्ष मॉडेलमध्ये असेल. थेट मॉडेल ई रुपया रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केला जाईल.
बँक अप्रत्यक्ष मॉडेलसह ई-रुपीमध्ये देखील सहभागी होईल. ई-रुपया टोकन स्वरूपात असेल.

क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉईनला स्पर्धा करणारे ई रुपया चलन असणार आहे. हिशेबासाठी ई-रुपी देखील वेगळा
असेल. हे मोबाईल वॉलेट किंवा ऑनलाइन पेमेंटसारखे काम करेल. डिजिटल करन्सी फोनमधील पेमेंट अ‍ॅपवर सुद्धा ठेवू शकता.

Web Title :-  RBI | reserve bank lunch digital currency what is the benefits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Raje Chhatrapati | स्वराज्य पक्षांच्या 105 पेक्षा जास्त शाखांचे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन

Ravi Rana | माझ्या विरोधात 50 लोक उभे राहिले, तरी मी निवडून येईन – रवी राणा