ठेवीदार-सभासदांमध्ये गोंधळ ! महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द

पोलीसनामा ऑनलाइन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) ने सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध कराड जनता सहकारी बँकेचा (Karad Janata Sahakari Bank) बँकिंग परवाना रद्द केला आहे. बँकिंग क्षेत्रात खळबळ माजवणारी ही एक घटना आहे. त्यानंतर सभासद आणि ठेवीदारांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. RBI ने जारी केलेले आदेश आजच प्राप्त झाले आहेत. सहकार आयुक्तांनी बँक अवसायनत (Liquidation) मध्ये गेल्याचं जाहीर केलं. परवाना रद्द झाल्यानंतर त्यांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर केली आहे. दरम्यान, मनोहर माळी यांची अवसायनिक म्हणून उपनिबंधक म्हणून या बँकेवर नियुक्ती झाल्याचं समजतं.

RBI च्या या निर्णयामुळे या सर्व सभासदांना आणि ठेवीदारांना मोठा झटका बसला आहे. कराड जनता सहकारी बँकेचे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई याठिकाणी एकूण २९ शाखा आहेत. त्यामध्ये ३२ हजार सभासद आहेत. या बँकेच्या संचालकांवर ३१० कोटी अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याचप्रमाणे २०१७ साली या बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले होते.